Pune Video: पुण्यात पीएमपीएल बसचालकाची मुजोरी, चष्मा फुटेपर्यंत मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Last Updated:

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी वाढत आहे.

पुणे : पुणे शहरात पीएमपीएल बसचालकाच्या माजाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. किरकोळ वादातून बसचालकाने एका व्यक्तीला शिवीगाळ करत भर रस्त्यातच मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे पीएमपीएल प्रशासनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हा प्रकार भेकराईनगर ते भोसरी या मार्गावरील बसमध्ये घडला. संबंधित व्यक्ती आणि बसचालक यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. व्हिडिओमध्ये दिसतं की बस चालकाने प्रथम त्या व्यक्तीशी उर्मट भाषेत वाद घातला. त्यानंतर संतापाच्या भरात चालक थेट बसमधून खाली उतरला आणि त्या व्यक्तीच्या कानशिलात जोरदार लगावली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे त्या व्यक्तीचा चष्मा तुटला.
advertisement

बसचालकांवर कठोर कारवाईची मागणी

घटनेनंतर सुद्धा बसचालकाने संताप शांत न करता त्याच्यावर पुन्हा पुन्हा हात उगारला. या सर्व प्रकारादरम्यान परिसरातील काही नागरिकांनी मोबाईलवर व्हिडीओ शूट केला, जो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, अशा प्रकारच्या बसचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
advertisement

सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत

दरम्यान, पीएमपीएल प्रशासनाने या घटनेची दखल घेतल्याचे समजते. शहरात यापूर्वीही पीएमपीएल बसचालकांच्या उद्धट वर्तनाचे प्रकार समोर आले आहेत. मात्र वारंवार तक्रारी असूनही ठोस पावले उचलली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, प्रशासनाने तत्काळ पावले उचलावीत, अशी मागणी वाढत आहे.
advertisement

समाज मध्यामावर तीव्र संताप

या घटनेचा व्हिडिओ काढून समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे.मारहाण करणारा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने या घटनेतील मुजोर चालकाच्या माज बाबत दिवसभर समाज मध्यामावर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Video: पुण्यात पीएमपीएल बसचालकाची मुजोरी, चष्मा फुटेपर्यंत मारहाण; व्हिडीओ व्हायरल
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement