पीएमआरडीएचा महत्त्वाचा निर्णय,आता एका क्लिकवर होणार काम, या 29 सेवा ऑनलाईन
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आता विविध परवानग्या आणि दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. प्रशासनाने एकूण 29 सेवा अधिसूचित केल्या असून त्या पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. आता विविध परवानग्या आणि दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. प्रशासनाने एकूण 29 सेवा अधिसूचित केल्या असून त्या पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याबाबतचे अधिकृत परिपत्रक महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी जारी केले आहे. यापुढे कोणतेही ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर वेळ वाचणार असून, दाखले आणि परवानग्या मिळवण्यासाठी होणारा अनावश्यक त्रासही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. या नव्या प्रणालीमुळे पीएमआरडीएच्या कामकाजात पारदर्शकता निर्माण होण्यास मदत होणार आहे. ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या सेवा उपलब्ध झाल्याने यांचा नागरिकांना फायदा होणार आहे .तसेच दाखले मिळवण्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही.या सर्व सेवा लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत येत असल्याने, निश्चित कालमर्यादेत त्या देणे प्रशासनासाठी बंधनकारक राहणार आहे.
advertisement
कोणत्या सेवा ऑनलाईन आणि ऑफलाईन?
विकास परवानगी विभागाशी संबंधित इमारत बांधकाम परवानगी, जोत मोजणी प्रमाणपत्र, भोगवटा प्रमाणपत्र, झोन दाखला, भाग नकाशा, सुधारित बांधकाम परवानगी तसेच इतर तांत्रिक परवानग्यांसाठी आता नागरिकांना केवळ ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.याचबरोबर जमीन व मालमत्ता विभागाशी निगडित भूखंड किंवा सदनिकांचे हस्तांतरण, वारस नोंद, कर्जासाठी लागणारे ना-हरकत प्रमाणपत्र, भूखंडांची फेरमोजणी तसेच अग्निशमन विभागाचे ना-हरकत दाखले आणि पर्यावरण मंजुरी प्रमाणपत्रही ऑनलाइन प्रक्रियेद्वारेच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
advertisement
ऑनलाईन अर्ज पद्धत बंद , 29 सेवा डिजिटल
पीएमआरडीएने तब्बल 29 सेवा पूर्णपणे ऑनलाईन केल्या असून, यामुळे प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ आणि पारदर्शक होणार आहे. पीएमआरडीए प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आली आहे की, नागरिकांना सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, सर्व सेवा ठरावीक कालमर्यादेत मिळाव्यात आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 16, 2026 6:39 PM IST









