खटाखट, खटाखट; अवघ्या मिनिटात 11 पुणेकरांची बँक खाती रिकामी, सायबर सेलला फुटला घाम

Last Updated:

सायबर गुन्हेगारांनी पुणेकरांच्या दोन कोटी 16 लाख रूपयांवर डल्ला मारलाय. या प्रकारानंतर पुणे पोलीस सतर्क झाले असून तपास करण्यात येत आहे.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारांनी महाराष्ट्रासह देशात कहर केला आहे. शुक्रवारी पुण्यात सायबर गुन्हेगारांनी हद्द पार केली. एकाच दिवसात पुण्यात 11 वेगवेगळ्या ठिकाणी गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. सायबर गुन्हेगारांनी पुणेकरांचे दोन कोटी 16 लाख रूपयांवर डल्ला मारलाय. या प्रकारानंतर पुणे पोलीस सतर्क झाले असून तपास करण्यात येत आहे.
advertisement
फेडेक्स कुरिअर, मनी लाँड्रींग, शेअर ट्रेडिंग, प्रीपेड टास्क, फेक अॅप, बनावट लिंक अशा विविध माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी नागरिकांचे बक खाते केले रिकामे पुण्यातील विविध पोलिस ठाण्यात नेमके कोणते गुन्हे दाखल आहेत

1. सायबर पोलिस ठाणे: ‘मनी लाँड्रींग’च्या नावाने फसवणूक

सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकास मनी लाँड्रिगची भीती दाखवून चौकशीच्या बहाण्याने 63 लाख 40 हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडले
advertisement

2. वारजे:  बनावट गुंतवणूक अॅपद्वारे 54.81 लाखांची लूट

स्टॉक ट्रेडिंगमध्ये भरघोस परताव्याचे आमिष दाखवून एका 58 वर्षीय व्यक्तीला लिंक पाठवली. त्या लिंकद्वारे ‘घानी सिक्युरिटी’ नावाचे अॅप इन्स्टॉल करायला सांगण्यात आले. अॅप पूर्णपणे बनावट असल्याचे लक्षात येईपर्यंत 54 लाख रुपये गायब

3. खडक: प्रीपेड टास्कद्वारे पाच लाखांचा फटका

गणेशपेठेतील एका व्यक्तीस टेलिग्रामद्वारे प्रीपेड टास्क पाठवण्यात आले. ‘टास्क पूर्ण केल्यास भरपूर पैसे मिळतील,’ असे सांगत सतत पैसे जमा करण्यास सांगण्यात आले.
advertisement

4. उत्तमनगर: महिलेची 3.37 लाखांची फसवणूक

शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून 63 वर्षीय ज्येष्ठ महिलेस लिंक पाठवून काढून घेतले पैसे

5. नांदेड सिटी: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली 5.61 लाख गायब
शेअर मार्केटमध्ये फायदा मिळेल असे 47 वर्षीय व्यक्तीला सांगून गुंतवणुकीच्या नावाखाली सतत रक्कम भरण्यास लावले आणि बँकेतील 5.61 लाखांचा फटका बसला
advertisement

6. कोथरूड: पार्सल कस्टममध्ये अडकले

फेडेक्स कुरिअरमधून बोलत असल्याचे भासवून चोरट्यांनी 51 वर्षीय व्यक्तीला ‘आपले पार्सल कस्टममध्ये अडकले आहे,’ असे सांगिले. पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याची भीती दाखवून फिर्यादीकडून बँक खात्याचे तपशील घेऊन 25 लाखांहून अधिक रक्कम बँक खात्यात वळवली.

7. चतु:शृंगी:  प्रीपेड टास्कच्या बहाण्याने 14.69 लाखांना गंडा

औंधमधील व्यक्तीस प्रीपेड टास्क देत कमाईचे लालच दाखवण्यात आले. चांगल्या परताव्याच्या आमिषाने 14.69 लाख रुपये हडप करण्यात आले.
advertisement

8. बाणेर: प्रीपेड टास्कद्वारे 25 लाख उकळले

प्रीपेड टास्कमधून मोठ्या कमाई मिळवून देण्याच्या नावाखाली बाणेरमधील 45 वर्षीय व्यक्तीकडून 25 लाख रुपये उकळले.

9. वानवडी: ज्येष्ठ महिलेची 9.78 लाखांची फसवणूक

ज्येष्ठ महिलेने कोणतीही माहिती, ओटीपी किंवा तपशील न देता त्यांच्या डेबिट कार्डमधून सायबर चोरट्यांनी 9.78 लाख रुपये काढले.

10. वानवडी : 5.61 लाखांची शेअर फसवणूक

advertisement
एका 59 वर्षीय व्यक्तीस शेअर ट्रेडिंगमध्ये चांगल्या परताव्याचे  स्वप्न दाखवण्यात आले. सतत रक्कम टाकायला लावून 5.61 लाखांची फसवणूक केली.

11. चंदननगर: तरुणीला चार लाखांना गंडा

तरुणीला हॉटेल रिव्ह्यू आणि लाईक करण्यासाठी ‘टास्क’ देण्यात आले. टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम भरल्यानंतर तिला आपले पैसे गेल्याचे समजले
सायबर चोरट्यांचा गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ सुरू आहे. पुण्यामध्ये एकाच दिवशी सायबर गुन्हेगारीच्या 11 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पुण्यातून एकाच दिवशी दोन कोटी 16 लाखांची ऑनलाइन लूट झाल्याचे समोर आलेय. फेडेक्स कुरिअर, मनी लाँड्रींग, शेअर ट्रेडिंग, प्रीपेड टास्क, फेक अॅप, बनावट लिंक अशा विविध माध्यमातून सायबर गुन्हेगारांनी नागरिकांचे बॅंक खाते रिकामे केलेय. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआधी हजारवेळा विचार करावा. पोलिसांकडून या गुन्ह्यांचा तपास करण्यात येत आहे. कोणत्याही लिंकवर नागरिकांनी क्लिक करू नये, अशी सूचना पोलिसांकडून करण्यात आली आहे.
एकीकडे पुण्यात रस्त्यावरची गुन्हेगारी वाढत असताना आता सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये देखील मोठी वाढ होताना पाहायला मिळत आहे. पुण्यातील सायबर पोलिसांकडून शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक सायबर एक्स्पर्टची टीम बसवण्यात आली आहे. जेणेकरून जर ऑनलाईन फ्रॉड सारखा प्रकार झाला तर तात्काळ त्या व्यक्तीला मदत मिळावी पण गेल्या काही दिवसांची आकडेवारी पाहता कोट्याधी रुपयांची पुणेकरांची फसवणूक या ऑनलाइन फ्रॉड झालेली पाहायला मिळत आहे. पुण्यासारख्या शहरात एकाच दिवसात सायबर फसवणुकीचे 11 गुन्हे घडण आणि त्यातून कोट्यावधींची फसवणूक होणं हे नवलच

आमिषाला बळी पडू नका

तर दुसरीकडे सायबर एक्सपर्ट यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल याबाबत वेगवेगळ्या उपाययोजना राबवत असून नागरिकांमध्ये जागरूकता देखील आणण्याचा प्रयत्न करत आहे मात्र या गोष्टी सातत्याने घडत असून, या बद्दलची माहिती आणि awareness समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत नाही. अशा आमिषाला बळी पडून लोक खूप मोठी चूक करत असल्याचं सायबर एक्स्पर्टचं म्हणणं आहे..

ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे कधी थांबणार?

पुणे पोलिसांकडून हे सगळे गुन्हे नोंदवण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू असल्याचा सांगितलं जात आहे.. तर अनेक गुन्हांमध्ये आम्ही परतावे देत असून याबाबत ठोस पावले उचलल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे... मात्र हे सगळे ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे कधी थांबणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
खटाखट, खटाखट; अवघ्या मिनिटात 11 पुणेकरांची बँक खाती रिकामी, सायबर सेलला फुटला घाम
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement