Pune Accident : पुण्यात ओव्हरटेक करायच्या नादात घात, टँकर-ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

Last Updated:

पुण्याच्या शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत ओव्हरटेक करायच्या नादात मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे.ट्रक आणि टॅकरचा भीषण धडक झाली आहे.

pune accident news shirur
pune accident news shirur
Pune Accident News : पुण्याच्या शिरूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत ओव्हरटेक करायच्या नादात मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे.ट्रक आणि टॅकरचा भीषण धडक झाली आहे. या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.शांताबाई वाजे (आई), ज्ञानेश्वर वाजे ( मुलगा), युवांश वाजे ( नातू) या तिघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.त्यामुळे वाजे कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने शिरूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दूध टॅकरचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दूध वाहतूक करणारा टँकर भरधाव वेगाने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होता. या दरम्यान दूध टॅकरने ट्रकला पाठीमागून धडक होती. या अपघातात दुध गाडीतून प्रवास करणाऱ्या तिघांचा मृत्यू झाला.
कवठे गावाजवळील कुटुंबातील वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमासाठी येत असताना बाप लेकासह वयोवृद्ध आजीचा अपघाती दुदैवी मृत्यू झाला आहे. ज्ञानेश्वर वाजे आणि युवांश वाजे अशा या बापलेकाचे नाव आहे. आणि शांताबाई वाजे असे या वृयोवृद्ध आजीचे नाव आहे. या घटनेने वाजे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच शिरूरमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
advertisement

पुण्यात डीसीपीच्या गाडीला धडक

पुणे शहरात 'ड्रंक अँड ड्राइव्ह'च्या घटना सातत्याने समोर येत असताना, आता एका मद्यधुंद चालकाने चक्क वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त (DCP) हिम्मत जाधव यांच्या गाडीला धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मुंढवा परिसरातील केशवनगर येथे रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. अपघातात DCP जाधव यांची मुलगी किरकोळ जखमी झाली आहे.
advertisement
या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात 'ड्रंक अँड ड्राइव्ह' (दारू पिऊन गाडी चालवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Accident : पुण्यात ओव्हरटेक करायच्या नादात घात, टँकर-ट्रकचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement