पुण्यात अजित पवारांच्या स्वागतासाठी पठ्ठ्यानं लढवली अनोखी शक्कल, थेट क्रेनला लटकला, दादांनी ठोकला सॅल्युट! पाहा Video
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Ajit Pawar Rally Video : अजित पवार यांच्या पुण्यातील भव्य रॅलीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक उपाध्यक्ष करण गायकवाड यांनी उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात अनोखा आणि लक्षवेधी सत्कार केला.
Pune Ajit Pawar Rally Video : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात एकत्र पत्रकार परिषद घेतली. पिंपरी- चिंचवड आणि पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहे. अशातच आता अजित पवार यांनी पत्रकार परिषदेनंतर रोड शो केला. पुण्यातील सेवन लव्ह चौकातून रोड शोला सुरुवात झाली. मात्र, यावेळी एका पठ्ठ्यानं असं काही केलं की अजित पवार यांना देखील धक्का बसला.
अनोखा आणि लक्षवेधी सत्कार
अजित पवार यांच्या पुण्यातील भव्य रॅलीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक उपाध्यक्ष करण गायकवाड यांनी उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात अनोखा आणि लक्षवेधी सत्कार केला. क्रेनला स्वतः लटकून त्यांनी हार परिधान केला, तसेच सामाजिक समतेचे प्रतीक असलेली महात्मा फुले यांची पगडी घालण्यात आली. त्यावेळी करण गायकवाड यांचं धाडस पाहून अजित पवार देखील शॉक झाले. ओळखीचा चेहरा पाहून अजित पवारांनी देखील सेल्युट केला.
advertisement
मोफत बस आणि मेट्रो सेवेचं आश्वासन
पुण्यातील चार मतदारसंघात अजित पवार यांनी रोड शो केला. अजित पवार यांच्यासाठी पुणे महानगरपालिका निवडणूक अतितटीची झाली आहे. अजित पवार यांनी राज्यातील पुणे आणि पिपंरी चिंचवड महापालिकेत आपलं वर्चस्व रहावं यासाठी ताकद लावली आहे. अशातच आता पुण्यात अजित पवार यांनी पुणेकरांना गुड न्यूज दिली आहे. अजित पवार यांनी मोफत बस आणि मेट्रो सेवेचं आश्वासन दिलंय.
advertisement
पुण्यात अजित पवारांच्या रॅलीला तुफान गर्दी, पठ्ठ्यानं लढवली अनोखी शक्कल #Pune #AjitPawar pic.twitter.com/MzFse69JYQ
— News18Lokmat (@News18lokmat) January 10, 2026
पाच मुद्द्यावरून आश्वासन
दरम्यान, पुण्यात आज अजित पवार यांनी मोठी घोषणा केली. आज मी नेता म्हणून नाही, तर पुणेकर म्हणून बोललो. कारण जिथं आपलेपणा असतो, तिथं कारणं दिली जात नाहीत. तिथं जबाबदारी घेतली जाते, असं म्हणत अजित पवार यांनी पुणेकरांसाठी मोठी घोषणा केली आहे. पुणेकरांसाठी मोफत मेट्रो आणि बस सेवा सुरू करणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीरनामा घोषित केलाय. अजित पवार यांनी पुणेकरांना पाच मुद्द्यावरून आश्वासन दिलं.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 2:16 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात अजित पवारांच्या स्वागतासाठी पठ्ठ्यानं लढवली अनोखी शक्कल, थेट क्रेनला लटकला, दादांनी ठोकला सॅल्युट! पाहा Video









