पीएम घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचंही नाव आलंय का? मोबाइलवरून 2 मिनिटांत करा चेक

Last Updated:

PM Gharkul Yojana : ग्रामीण भागातील गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी स्वतःचे पक्के घर असावे, या उद्देशाने केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण’ (PMAY-G) ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली आहे.

pm awas yojana
pm awas yojana
मुंबई : ग्रामीण भागातील गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी स्वतःचे पक्के घर असावे, या उद्देशाने केंद्र सरकारनेप्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’ (PMAY-G) ही महत्त्वाकांक्षी योजना राबवली आहे. आजही देशातील अनेक ग्रामीण कुटुंबे कच्च्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा धोकादायक अवस्थेतील निवाऱ्यांमध्ये वास्तव्यास आहेत. अशा कुटुंबांना सुरक्षित, मजबूत आणि सन्मानाने राहता येईल असे घर मिळावे, यासाठी ही योजना मोठा आधार ठरत आहे.
advertisement
या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि ग्रामपंचायत यांचा समन्वय साधून ही योजना राबवली जाते. लाभार्थ्यांना मिळणारी मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, त्यामुळे मध्यस्थांचा हस्तक्षेप टाळला जातो. घरकुलासाठी दिली जाणारी रक्कम तीन टप्प्यांत वितरित केली जाते. पहिला हप्ता घरकुल मंजूर झाल्यानंतर, दुसरा हप्ता घराचे बांधकाम सुरू झाल्यावर आणि तिसरा व अंतिम हप्ता घर पूर्ण झाल्यानंतर दिला जातो.
advertisement
मात्र, अनेकदा अर्ज करूनही आपले नाव लाभार्थी यादीत आले आहे की नाही, याबाबत ग्रामीण भागातील लोकांमध्ये संभ्रम असतो. काही जण यासाठी ग्रामपंचायत, तालुका कार्यालय किंवा इतर ठिकाणी वारंवार फेऱ्या मारतात. पण आता तसं करण्याची गरज उरलेली नाही. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी सोपी आणि पारदर्शक ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे कोणीही नागरिक घरबसल्या मोबाईल किंवा संगणकाच्या मदतीने आपले नाव यादीत आहे की नाही, हे तपासू शकतो.
advertisement
ऑनलाइन पद्धतीने लाभार्थी यादी कशी पाहावी?
सर्वप्रथम मोबाईल किंवा संगणकावर इंटरनेट सुरू करून pmayg.nic.in किंवा pmaymis.gov.in यापैकी कोणतीही अधिकृत वेबसाइट उघडावी. वेबसाइट उघडल्यानंतर मुख्य पानावर “AwaasSoftहा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर “Reportsया विभागात प्रवेश करावा. पुढेSocial Audit Reports” हा पर्याय निवडावा. त्यानंतर “Beneficiary Details for Verification” या लिंकवर क्लिक करायचे आहे.
advertisement
यानंतर एक नवे पान उघडते. येथे राज्य, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडावे. योजना वर्ष (उदा. 2023-24) आणि योजना प्रकार म्हणून PMAY-G निवडावा. स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड भरल्यानंतर ‘Submitकिंवा ‘Get Report’ या बटणावर क्लिक करावे. काही क्षणातच तुमच्या गावातील संपूर्ण लाभार्थी यादी स्क्रीनवर दिसेल.
advertisement
या यादीमध्ये लाभार्थ्याचे नाव, घरकुल मंजुरी क्रमांक, तसेच घर बांधकामाची सद्यस्थिती (पहिला हप्ता, दुसरा हप्ता किंवा घर पूर्ण) अशी सविस्तर माहिती उपलब्ध असते. त्यामुळे आपले नाव आहे की नाही, हे लगेच स्पष्ट होते.
प्रधानमंत्री आवास योजना का महत्त्वाची?
ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसाठी घर बांधणे हे केवळ स्वप्नच राहते. उत्पन्न कमी, कर्जाचा भार आणि वाढती महागाई यामुळे पक्के घर उभारणे कठीण जाते. अशा वेळी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना आर्थिक आधार देत गरीब कुटुंबांना सुरक्षित निवारा देते. थेट खात्यात मिळणारी मदत, पारदर्शक यंत्रणा आणि ऑनलाइन माहिती उपलब्ध असल्यामुळे ही योजना लाखो ग्रामीण कुटुंबांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पीएम घरकुल योजनेच्या लाभार्थी यादीत तुमचंही नाव आलंय का? मोबाइलवरून 2 मिनिटांत करा चेक
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement