Pune Train : पुणे रेल्वेचा १० दिवसांचा 'मेगाब्लॉक'! अमरावती-नागपूरसह 11 गाड्या रद्द; 'हे' आहे नवीन वेळापत्रक

Last Updated:

दौंड ते काष्टी दरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि प्री-नॉन-इंटरलॉकिंगच्या कामासाठी हा पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे पुणे-सोलापूर आणि पुणे-अमरावती यांसारख्या प्रमुख मार्गांवरील वाहतूक विस्कळीत होणार आहे.

पुणे रेल्वेचा १० दिवसांचा 'मेगाब्लॉक'
पुणे रेल्वेचा १० दिवसांचा 'मेगाब्लॉक'
पुणे : पुणे आणि दौंड दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेच्या तांत्रिक कामामुळे पुणे विभागातून सुटणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वे गाड्यांवर मोठा परिणाम होणार आहे. दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामासाठी १५ जानेवारी ते २५ जानेवारी २०२६ दरम्यान रेल्वेने 'मेगाब्लॉक' जाहीर केला आहे.
मेगाब्लॉकचे मुख्य कारण: दौंड ते काष्टी दरम्यान रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि प्री-नॉन-इंटरलॉकिंगच्या कामासाठी हा पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे पुणे-सोलापूर आणि पुणे-अमरावती यांसारख्या प्रमुख मार्गांवरील वाहतूक विस्कळीत होणार आहे.
या ११ महत्त्वाच्या गाड्या राहणार रद्द (२३ ते २६ जानेवारी दरम्यान) या मेगाब्लॉकमुळे खालील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे-अमरावती एक्स्प्रेस (11025/11026) आणि अमरावती-पुणे एक्स्प्रेस (12119).
advertisement
पुणे-सोलापूर एक्स्प्रेस (12169/12170) आणि सोलापूर-पुणे इंटरसिटी (12157/12158).
पुणे-नागपूर गरीब रथ (12113/12114) आणि अजनी-पुणे एक्स्प्रेस (12120).
पुणे-नांदेड एक्स्प्रेस (17629/17630).
पुणे-सोलापूर डेमू (11417/11418), पुणे-दौंड डेमू (71401/71402) आणि निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस.
गाड्यांच्या मार्गात बदल: काही गाड्या दौंडऐवजी वळण मार्गाने धावणार आहेत.
यशवंतपूर-चंडीगड, जम्मू तवी-पुणे आणि हजरत निजामुद्दीन-वास्को-द-गामा: या गाड्या मनमाड-इगतपुरी-कल्याण-पनवेल-लोणावळा मार्गे पुण्याला येतील.
सातारा-दादर एक्स्प्रेस: ही गाडी जेजुरी मार्गे धावेल.
advertisement
तिरुअनंतपुरम-CSMT एक्स्प्रेस: कुर्डुवाडी-मिरज मार्गे वळवण्यात आली आहे.
अडचणी टाळण्यासाठी गाड्यांचे 'शॉर्ट टर्मिनेशन':
इंदूर-दौंड आणि ग्वाल्हेर-दौंड एक्स्प्रेस दौंडपर्यंत न जाता खडकी स्थानकावरच थांबतील.
दौंड-इंदूर एक्स्प्रेस २४ आणि २५ जानेवारीला दौंडऐवजी पुण्याहून सुटेल.
रेल्वे विभागाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासाला निघण्यापूर्वी अधिकृत वेळापत्रक तपासावे जेणेकरून गैरसोय टाळता येईल.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Train : पुणे रेल्वेचा १० दिवसांचा 'मेगाब्लॉक'! अमरावती-नागपूरसह 11 गाड्या रद्द; 'हे' आहे नवीन वेळापत्रक
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement