बाणेरमधील 'त्या' घराचं काळं गुपित! काही वर्षांच्या अंतराने दोन बहिणींचा गूढ मृत्यू; पुणेकरांच्या मनात वेगळीच शंका, उतरले रस्त्यावर
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे : पुण्यातील उच्चभ्रू बाणेर परिसरात २७ जानेवारी रोजी एका २० वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला. मात्र, या घटनेमागील गूढ आता अधिकच गडद झालं आहे. या प्रकरणाने संपूर्ण पुणेकरांना हादरवून सोडलं आहे. विशेष म्हणजे, ज्या नातेवाईकाकडे या तरुणीचा मृत्यू झाला, त्याच घरात काही वर्षांपूर्वी तिच्या मोठ्या बहिणीचाही अशाच प्रकारे संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या? असा प्रश्न उपस्थित करत संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
नेमकी घटना काय?
मृत तरुणी ही बाणेर येथील एका नातेवाईकाकडे राहत होती. २७ जानेवारी रोजी तिचा संशयास्पद मृत्यू झाला. परिसरातील नागरिक आणि सामाजिक संघटनांचा आरोप आहे की, या मुलींना संबंधित नातेवाईकाकडे अमानुष कामाचा ताण, मानसिक छळ आणि निर्दयी वागणूक सहन करावी लागत होती. जर मोठ्या बहिणीच्या मृत्यूच्या वेळी योग्य तपास झाला असता, तर आज लहान बहिणीचा जीव वाचला असता, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
advertisement
पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह आणि पोलीस ठाण्यावर मोर्चा
या घटनेला १० पेक्षा जास्त दिवस उलटूनही अद्याप एफआयआर (FIR) नोंदवण्यात न आल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. पोलिसांच्या भूमिकेवर आणि तपासाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. एका जागरूक नागरिकाने कायदेशीर प्रक्रियेची विचारणा केली असता त्याला 'झापण्यात' आल्याचीही चर्चा आहे, ज्यामुळे संशय अधिक बळावला आहे.
advertisement
शांततामय मोर्चा आणि श्रद्धांजली
रविवारी सायंकाळी ५ वाजता बाणेर-बालेवाडी रोडवर नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. मृत तरुणीला श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर हातात फलक घेऊन बाणेर पोलीस ठाण्यावर भव्य मोर्चा काढण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांना नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन देण्यात आले. "आम्ही कोणाच्याही द्वेषासाठी नाही, तर न्यायासाठी एकत्र आलो आहोत. निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होऊन सत्य समोर यावे," अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 09, 2026 9:39 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
बाणेरमधील 'त्या' घराचं काळं गुपित! काही वर्षांच्या अंतराने दोन बहिणींचा गूढ मृत्यू; पुणेकरांच्या मनात वेगळीच शंका, उतरले रस्त्यावर










