advertisement

पुण्यात भीषण अपघात; कंटेनरची बस, टेम्पो अन् कारला धडक, अपघातानंतरचा VIDEO आला समोर

Last Updated:

नवले ब्रिजच्या अलिकडे असणाऱ्या जांभूळवाडी दरीपुलावर हा अपघात झाला. अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत.

News18
News18
पुणे, 11 नोव्हेंबर : पुणे बंगळुरू महामार्गावर मध्यरात्री तीनच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका भरधाव कंटेनरने लक्झरी बस, टेम्पो आणि कारला धडक दिली. धडकेनंतर कंटेनर रस्त्यावर उलटला. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. जखमींचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
नवले ब्रिजच्या अलिकडे असणाऱ्या जांभूळवाडी दरीपुलावर हा अपघात झाला. नव्या कात्रज बोगद्याच्या पुढे बंगलोरहून पुण्याच्या दिशेने कंटेनर भरधाव वेगात येत होता. तीव्र उतारावर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्याने लक्झरी बस, टेम्पो आणि कारला धडक दिली. यामध्ये वाहनांचे नुकसान झाले.
advertisement
अपघातानंतर पहाटे चारच्या सुमारास अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य वेगाने सुरू कऱण्यात आले. दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. इतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असून वाहतूक सुरळीत केली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात भीषण अपघात; कंटेनरची बस, टेम्पो अन् कारला धडक, अपघातानंतरचा VIDEO आला समोर
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement