नवले ब्रीज अपघाताची बातमी फेक, आता पुण्यात कुठे झाला अपघात?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Pune Accident News: पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला होता. एका ब्रेक फेल असणाऱ्या कंटेनरने जवळपास २० ते २२ वाहनांना धडक दिली होती. आता पुन्हा पुण्यात भीषण अपघात झाला आहे.
वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे: मागील आठवड्यात पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात झाला होता. एका ब्रेक फेल असणाऱ्या कंटेनरने जवळपास २० ते २२ वाहनांना धडक दिली होती. या अपघातात ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. ज्यात एका तीन वर्षांच्या चिमुकलीचा देखील समावेश होता. ही अपघाताची घटना ताजी असताना पुन्हा एकदा पुण्यात भीषण अपघात झाला आहे. एका भरधाव कंटेनरने पाच ते सहा गाड्यांना उडवलं आहे.
हा अपघात झाल्यानंतर नवले पुलावरच पुन्हा अपघात झाल्याच्या काही बातम्या समोर आल्या. मात्र हा अपघात पुण्यातील नवले पुलावर झाला नसल्याची माहिती आता समोर आली आहे. हा अपघात पुण्यातील भूमकर चौकात झाला आहे. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या एका वाहनाने पाच ते सहा वाहनांना उडवलं आहे.
यात एका कंटेनरसह चार ते पाच चारचाकी वाहनांचा समावेश आहे. या अपघातात वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. नवले पूलवरील अपघाताप्रमाणेच इथंही तीव्र उतारावरून काही गाड्या पुढे आल्या त्याने पाच ते सहा गाड्या एकमेकांना धडकल्या आहे. या अपघातात चार चाकी वाहनांचं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाची बाब म्हणजे यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. काहीजण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
advertisement
खरं तर, पुण्यातील नवले पुलावर होणाऱ्या सततच्या अपघातामुळे तिथे वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. अलीकडेच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवले पुलाची पाहणी केली. त्यांनी इथं योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशातच आता भूमकर चौकात भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 17, 2025 2:43 PM IST


