Pune News: पुणे देशात अव्वल! CPCB चा अहवाल समोर, प्लास्टिक व्यवस्थापनात 99 टक्के गुण, कसं मिळालं यश?

Last Updated:

Plastic waste Management: पुण्यात कचरा तीन पातळ्यांवर वर्गीकृत होतो. कचरावेचकांनी प्लास्टिक पुनर्प्रक्रियेस पाठवल्यामुळे पुनर्निर्मितीचे प्रमाण 37 टक्के झाले आहे, जे इतर शहरांच्या तुलनेत तिप्पट आहे.

Pune News: पुणे देशात अव्वल! CPCB चा अहवाल समोर, प्लास्टिक व्यवस्थापनात 99 टक्के गुण, कसं मिळालं यश?
Pune News: पुणे देशात अव्वल! CPCB चा अहवाल समोर, प्लास्टिक व्यवस्थापनात 99 टक्के गुण, कसं मिळालं यश?
पुणे: पुणेकरांनी प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्वापरात आघाडी मिळवली आहे. वैयक्तिक पातळीवर, कचरावेचक आणि महापालिकेच्या प्रयत्नांमुळे पुण्यातील कचरा व्यवस्थित वर्गीकृत होतो, ज्यामुळे पुणे शहराला पहिला क्रमांक मिळालाय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 8 मोठ्या शहरांवरील सर्वेक्षणात पुण्याने प्लास्टिक कचऱ्याच्या संकलन, वर्गीकरण आणि पुनर्वापर यामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.
केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने 2022 सालापासून एकल-वापर प्लास्टिकवर बंदी घालली आहे. प्लास्टिकचा पुनर्वापर आणि कचरा कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे व नियम सुधारित केले आहेत, तसेच स्थानिक प्राधिकरणांना नियमित मूल्यांकन बंधनकारक केले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने विजयवाडा, कोलकता, भोपाळ, वडोदरा, शिलाँग, मैसुरू, पुणे आणि लखनौ येथे सर्वेक्षण केले असून, त्याचा अहवाल प्रकाशित केला आहे. सीपीसीबीच्या अभ्यास पथकाने प्रत्येक शहरातील कचरा संकलन केंद्रांपासून डेपोपर्यंत निवडक केंद्रांचा सखोल अभ्यास केला.
advertisement
पुण्याची देशात आघाडी
या केंद्रांवर जमा होणाऱ्या घनकचऱ्यातून प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण, एकल-वापर प्लास्टिकच्या वस्तू आणि त्यांचे वर्गीकरण याचे सखोल मूल्यांकन करण्यात आले. पुण्यातील औंध, घोले रस्ता कचरा संकलन केंद्र, हडपसर आणि उरुळी देवाची कचरा डेपो या केंद्रांचा अभ्यास केला गेला. आठ दिवसांच्या दररोज पाहणीत एकूण 5,696 किलो प्लास्टिक कचऱ्याचे नमुने गोळा करण्यात आले. या नमुन्यांचे वर्गीकरण केले गेले तसेच कचऱ्याच्या विल्हेवाटीवरून 1,263 किलो नमुने घेतले गेले. मिळालेली निरीक्षणे अहवालात सविस्तर नोंदवली आहेत. पुण्याने 98 ते 99 टक्के गुण मिळवले आहेत.
advertisement
शहरातील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट
शहरातील प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट करण्यात पुणे महापालिकेने 99 टक्के यश मिळवले आहे, तर विजयवाडा 66 टक्के, भोपाळ 59 टक्के, शिलाँग 21टक्के आणि कोलकाता फक्त 9 टक्के प्लास्टिक विल्हेवाट करण्यात यशस्वी झाला आहे.
शेवटच्या टप्प्यात कचरा डेपोत जाणाऱ्या कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण कमी करण्यात पुणे महापालिकेने आघाडी मिळवली आहे. त्याउलट, कोलकता आणि शिलाँगमध्ये प्लास्टिक कचऱ्याबाबत उदासीनता दिसून आली आहे. प्रशासकीय पातळीवर ओला आणि सुक्या कचऱ्याबाबत सातत्याने केलेली जनजागृती, बंदी असलेल्या प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळण्यासाठी राबविलेले उपक्रम आणि या वस्तू विकणाऱ्यांवर होत असलेले कारवाईमुळे प्लास्टिकच्या वापरात घट दिसून येत आहे.
advertisement
पुण्यात कचरा तीन पातळ्यांवर वर्गीकृत होतो. कचरावेचकांनी प्लास्टिक पुनर्प्रक्रियेस पाठवल्यामुळे पुनर्निर्मितीचे प्रमाण 37 टक्के झाले आहे, जे इतर शहरांच्या तुलनेत तिप्पट आहे, अशी माहिती स्वच्छ संस्था संचालक हर्षद बडे यांनी दिली.
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुणे देशात अव्वल! CPCB चा अहवाल समोर, प्लास्टिक व्यवस्थापनात 99 टक्के गुण, कसं मिळालं यश?
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement