Pune Crime : पुण्यातील टोळीयुद्ध चव्हाट्यावर! कुख्यात गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तांचा सज्जड दम!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune CP Amitesh Kumar : नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सध्या शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देत आहेत. पुण्यातील एका मंडळाला भेट दिल्यानंतर नागरिकांना संबोधित करताना त्यांनी हा इशारा दिला.
Pune CP Amitesh Kumar : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रकार मोठ्या संख्येने वाढत असून पुणे पोलिसांवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. अशातच आता नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आणि गैरकृत्ये करणाऱ्या लोकांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सज्जड इशारा दिला आहे. 'ज्यांनी आमच्या विनंतीला मान न देता कायद्याचे उल्लंघन केले, तेव्हा आमची विनंती नाही, फक्त आमची काठी आणि त्याचं शरीर राहील,' अशा कठोर शब्दांत त्यांनी गुन्हेगारांना दम भरला आहे.
नियमात आणि कायद्यात चाला, नाहीतर...
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे सध्या शहरातील विविध गणेश मंडळांना भेट देत आहेत. पुण्यातील एका मंडळाला भेट दिल्यानंतर नागरिकांना संबोधित करताना त्यांनी हा इशारा दिला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, जे लोकं कायद्याच्या विरुद्ध बाजूने चालणारे आहेत, त्यांना आम्ही विनंती करतो की त्यांनी नियमात आणि कायद्यात चालावं नाहीतर आमची काठी आहेच... तसेच, शहरात कोणतीही आपत्तीजनक घटना होऊ देऊ नये, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
advertisement
नियमित चालणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी - पुणे सीपी
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कठोर भाषेत इशारा देताना ते पुढे म्हणाले, "अवैध धंदे किंवा गैरकृत्य करणारे कोणी असेल तर, त्यांना आमची स्पष्ट सूचना आहे की त्यांनी मार्गे चालावे. तुमचं आमचं काही कटुता नाही." यावेळी त्यांनी सामान्य नागरिकांना सुरक्षिततेचा विश्वास दिला. "नियमित चालणाऱ्या नागरिकांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत," असे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.
advertisement
सज्जड इशारा
दरम्यान, पोलीस आयुक्तांनी दिलेल्या या सज्जड इशाऱ्यामुळे पुणे शहरात कायद्याचे पालन न करणाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता पुण्यातील टोळक्यांची दहशत संपणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 26, 2025 10:09 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पुण्यातील टोळीयुद्ध चव्हाट्यावर! कुख्यात गुन्हेगारांना पुणे पोलीस आयुक्तांचा सज्जड दम!