Pune Crime : हत्यारं घेऊन गार्डनमध्ये दबा धरून बसले, सोन्याला फोन करून बोलवलं अन् सपासप वार, चंदननगरमध्ये रक्तरंजित थरार

Last Updated:

Pune Chandannagar Oxygen Park Murder : लखन ऊर्फ सोन्या सकट असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून तो फक्त 19 वर्षांचा होता. प्रथमेश दर्डू आणि यश गायकवाड यांनी वार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Pune Chandannagar Oxygen Park Murder
Pune Chandannagar Oxygen Park Murder
Pune Murder News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. खासकरून लहान मुलांचा गुन्हेगारीकडे कल वाढत चालला आहे. अशातच पुण्यातील चंदननगरमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा जवळच्या ऑक्सिजन पार्क येथे मित्रानेच मित्राचा काटा काढल्याची घटना घडली. हल्ल्यात मुलावर 20 ते 25 वार करण्यात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळातंय.
पूर्ववैमनस्यातील भांडणे मिटविण्यासाठी बोलावून घेतलेल्या तरुणावर दोन जणांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना काल शनिवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ऑक्सिजन पार्क उद्यानात घडली. लखन ऊर्फ सोन्या सकट असं खून झालेल्या तरुणाचं नाव असून तो फक्त 19 वर्षांचा होता. प्रथमेश दर्डू आणि यश गायकवाड यांनी वार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
advertisement
चंदननगर परिसरात जुन्या मुंढवा रस्त्यावर ऑक्सिजन पार्क उद्यान दररोज गर्दीने भरलेलं असतं. शुक्रवारी रात्री लखन आणि आरोपी यांच्यात वाद पेटला. त्यानंतर त्यांची भांडणं झाली. भांडणं मिटवण्यासाठी लखन शनिवारी रात्री उद्यानात आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत त्याचा एक मित्र देखील होता. त्यावेळी लखनला मारण्यासाठी आरोपींनी उद्यानात दबा धरला. त्याला गार्डनमध्ये बोलवलं होतं.
advertisement
आरोपी प्रथमेश दर्डू आणि यश गायकवाड आधीच हत्यारे घेऊन उद्यानात सकटची वाट बघत थांबले होते. सकट याला पाहताच आरोपींनी याच्यावर धारदार हत्याराने वार केले. हाता-पायावर, पोटावर, तोंडावर आणि डोक्यावर सुमारे 20 ते 25 वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी धाव घेतली अन् प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मात्र, या घटनेमुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : हत्यारं घेऊन गार्डनमध्ये दबा धरून बसले, सोन्याला फोन करून बोलवलं अन् सपासप वार, चंदननगरमध्ये रक्तरंजित थरार
Next Article
advertisement
Beed News : ग्रामसेवकाला जातीवाचक शिवीगाळ, रक्तबंबाळ होईपर्यंत रॉडने मारहाण, गेवराईच्या घटनेने बीडमध्ये खळबळ!
ग्रामसेवकाला जातीवाचक शिवीगाळ, रक्तबंबाळ होईपर्यंत रॉडने मारहाण, बीड हादरलं
  • ग्रामसेवकाला जातीवाचक शिवीगाळ, रक्तबंबाळ होईपर्यंत रॉडने मारहाण, बीड हादरलं

  • ग्रामसेवकाला जातीवाचक शिवीगाळ, रक्तबंबाळ होईपर्यंत रॉडने मारहाण, बीड हादरलं

  • ग्रामसेवकाला जातीवाचक शिवीगाळ, रक्तबंबाळ होईपर्यंत रॉडने मारहाण, बीड हादरलं

View All
advertisement