Pune News: पुण्यात 22 वर्षीय तरुणाकडे आढळलं पिस्तुल; खरेदीचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले

Last Updated:

पोलिसांनी तातडीने सापळा रचून वेदांत सोसायटीजवळ आदित्य ढसाळ याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या पँटमध्ये खोचलेले ५२ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आणि दोन काडतुसे सापडली.

तरुणाकडे आढळलं पिस्तुल AI Image)
तरुणाकडे आढळलं पिस्तुल AI Image)
पुणे : पुण्यातील मांजरी परिसरातून गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने एका २२ वर्षीय तरुणाला बेकायदेशीररीत्या गावठी पिस्तुल बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. आदित्य अमोल ढसाळ (रा. वेदांत सोसायटी, मांजरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
नेमकी घटना काय?
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी आणि शहरात गस्त वाढवण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे पथक चंदननगर परिसरात गस्त घालत असताना, त्यांना मांजरी येथील एका तरुणाकडे हत्यार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने सापळा रचून वेदांत सोसायटीजवळ आदित्य ढसाळ याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्या पँटमध्ये खोचलेले ५२ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तुल आणि दोन काडतुसे सापडली.
advertisement
पिस्तुल खरेदीचे कारण ऐकून पोलीसही चकित: आदित्य ढसाळ याची वाद्य विक्रीची दोन दुकाने आहेत. पोलिसांच्या चौकशीत त्याने पिस्तुल बाळगण्याबाबत धक्कादायक कारण सांगितले. त्याच्या सोसायटीत नुकतीच काही लोकांमध्ये जोरदार भांडणे झाली होती. "भविष्यात आपली कोणाशी भांडणे झाली, तर स्वरक्षणासाठी शस्त्र जवळ हवे," या भीतीपोटी त्याने रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराकडून हे पिस्तुल खरेदी केले होते.
advertisement
स्वरक्षणाच्या नावाखाली बेकायदेशीर शस्त्र बाळगणे हा गंभीर गुन्हा असून, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे पिस्तुल त्याला कोणाकडून मिळाले आणि याचा काही मोठा कट होता का, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: पुण्यात 22 वर्षीय तरुणाकडे आढळलं पिस्तुल; खरेदीचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले
Next Article
advertisement
Silver Price Prediction: गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्टने काय म्हटलं?
गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं! अडीच लाखांवर पोहोचलेली चांदी आता गडगडणार? एक्सपर्ट
  • मागील वर्षात चांदीने गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न दिले.

  • चांदीच्या दरात मागील काही दिवसापूर्वी चांगलीच उसळण दिसून आली होती.

  • त्यानंतर गुंतवणूकदारांकडून गुंतवणुकीसाठी चांदीच्या पर्यायाकडे प्राधान्य दिले जात

View All
advertisement