'गे डेटिंग ॲप'वर ओळख! तरुणासोबत हुकअपची स्वप्न रंगवून तो भेटायला गेला पण भयानक घडलं; पुण्यात अजब घटना
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
आरोपीने आपले नाव 'राहील' असल्याचे सांगून संवाद वाढवला. त्यानंतर आरोपीने तरुणाला हुकअपसाठी कोंढव्यातील शितल पेट्रोल पंप परिसरात बोलावले.
पुणे : पुणे शहरात समलिंगी डेटिंग ॲपवरून ओळख करून तरुणांना लुबाडणारी एक टोळी सक्रिय असल्याचं समोर आलं आहे. हुकअपच्या बहाण्याने एका २७ वर्षीय तरुणाला कोंढव्यात बोलावून, शस्त्राचा धाक दाखवत ८० हजार ३०० रुपयांना लुटल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
वाघोली परिसरात राहणारा फिर्यादी तरुण एका डेटिंग ॲपवर असताना त्याला 'Im Top' नावाच्या आयडीवरून मेसेज आला. त्यातील नंबरवर संपर्क साधला असता, आरोपीने आपले नाव 'राहील' असल्याचे सांगून संवाद वाढवला. त्यानंतर आरोपीने तरुणाला हुकअपसाठी कोंढव्यातील शितल पेट्रोल पंप परिसरात बोलावले.
advertisement
एकांत ठिकाणी नेऊन लूट: ठरल्याप्रमाणे तरुण कोंढव्यात पोहोचला, मात्र तिथे राहील एकटा नसून त्याचे तीन साथीदारही हजर होते. या चौघांनी मिळून तरुणाला गोड बोलून पानसरे नगरजवळील एका मैदानात नेलं. निर्जन स्थळी पोहोचताच आरोपींनी तरुणाला मारहाण करत शस्त्राचा धाक दाखवला. त्याच्याकडील महागडा मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि एटीएममधून पैसे काढून एकूण ८० हजार ३०० रुपये जबरदस्तीने लुटले. यानंतर आरोपी पसार झाले.
advertisement
या धक्कादायक प्रकारानंतर पीडित तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, डेटिंग ॲपवरील माहिती, मोबाईल नंबर आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. ऑनलाइन डेटिंग ॲप्स वापरताना अनोळखी व्यक्तींना भेटणे जिवावर बेतू शकते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 1:47 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
'गे डेटिंग ॲप'वर ओळख! तरुणासोबत हुकअपची स्वप्न रंगवून तो भेटायला गेला पण भयानक घडलं; पुण्यात अजब घटना










