मुंबई: भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात आज मोठा बदल घडताना दिसत असून टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपली पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक SUV टोयोटा अर्बन क्रूझर ईव्ही लाँच केली आहे. टोयोटाने आतापर्यंत इलेक्ट्रिक वाहनांबाबत सावध भूमिका घेऊन हायब्रिड आणि हायड्रोजन तंत्रज्ञानावर भर देत होती. पण, अखेरीस बाजारात ग्राहकांची मागणी पाहत टोयोटाने आपली पहिली इलेक्ट्रिक SUV आणली आहे. Ebella Urban Cruiser EV असं या SUV चं नाव आहे. या Ebella मुळे आता टोयोटा आता टाटा, महिंद्रा आणि सुझुकी यांच्यासोबतची स्पर्धा करणार आहे.



