Pune News : पुण्यात भरदिवसा हत्येचा थरार, हातोडी, रॉडने दोघांवर हल्ला, एकाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हित कैद
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Pune News : पुर्ववैमन्यासातून आंदेकर टोळीने दोन तरुणावर हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झाला आहे.
पुणे, 5 ऑक्टोबर (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : पुणे शहरात पुन्हा एकदा दिवसाढवळ्या हत्येचा थरार पाहायला मिळाला. नातेवाईकांकडे आलेल्या दोन तरुणांवर घराच्या बाहेर पडताच पूर्ववैमनस्यातून टोळक्याकडून हल्ला करण्यात आला. टोळीकडून हातोडी व स्क्रू ड्रायव्हर अशा अवजारांनी हल्ला केल्याने एकजण गंभीर जखमी झाला. यात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना (Pune) पुण्यात घडली आहे. पुण्यात भरदिवसा घडलेल्या घटनेचा सीसीटिव्ही समोर आला आहे. (Breaking Marathi News)
बिबवेबाडीत भरदिवसा हत्येचा थरार
बिबेवाडी आणि धनकवडी भागात राहणारे 2 तरुण तीन दिवसांपूर्वी पुण्यातील नाना पेठेतील नातेवाईकांकडे आले होते. या दोन्ही तरुणांचे याआधी नाना पेठेतील काही तरुणांशी एकमेकांकडे बघण्यावरुन दीड महिन्यापूर्वी वाद झाले होते. दरम्यान आज हे दोघेही या भागात येत असल्याची माहिती संबंधित तरुणांना मिळाली. त्यानंतर आरोपींनी पाळत ठेऊन दोघेही घराबाहेर येण्याची वाट पाहिली. दोघेही बाहेर येताच टोळक्याने त्या दोघांवर हातोडी आणि स्क्रीवड्रायवरने हल्ला चढवला.
advertisement
पुण्यात भरदिवसा पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून; हातोडीने तरुणांवर हल्ला pic.twitter.com/Z19dinp6vO
— VIRALबाबा (@viralmedia70) October 5, 2023
सहा जणांना अटक, 3 अल्पवयीन मुलांचा समावेश
याप्रकरणी पोलिसांनी सूर्यकांत उर्फ बंडु आण्णा राणोजी आंदेकर (वय 67), मुलगा कृष्णराज उर्फ कृष्णा सुर्यकांत आंदेकर (वय 33), तुषार निलंजय वाडेकर (वय 24), स्वराज निलंजय वाडेकर (वय 20) यांना अटक केली आहे. तर, 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तर अमीर आसीर खान हा फरार आहे. तो तडीपार असतानाही पुण्यात आला होता. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अनिकेत दूधभाते याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 05, 2023 7:50 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुण्यात भरदिवसा हत्येचा थरार, हातोडी, रॉडने दोघांवर हल्ला, एकाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हित कैद