advertisement

पुणे हादरलं! "मी पत्नीला संपवलंय.."; भल्या पहाटे मनोहर पोलिसांकडे आला, घराचा दरवाजा उघडताच सगळ्यांचा उडाला थरकाप

Last Updated:

पहाटेची वेळ असताना ५३ वर्षीय मनोहर नागोराव कांबळे हा शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोहोचला. "साहेब, मी माझ्या पत्नीचा खून केला आहे," असे त्याने शांतपणे सांगताच पोलीसही चक्रावून गेले.

पत्नीची हत्या (AI Image)
पत्नीची हत्या (AI Image)
पुणे : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे एका संतापजनक घटनेनं खळबळ उडाली आहे. किरकोळ प्रापंचिक वादातून पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी हातोडीने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, हे अघोरी कृत्य केल्यानंतर आरोपी पती स्वतःहून शिक्रापूर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
भल्या पहाटे पोलिसांना बसला धक्का
पहाटेची वेळ असताना ५३ वर्षीय मनोहर नागोराव कांबळे हा शिक्रापूर पोलीस ठाण्यात पोहोचला. "साहेब, मी माझ्या पत्नीचा खून केला आहे," असे त्याने शांतपणे सांगताच पोलीसही चक्रावून गेले. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेऊन तळेगाव ढमढेरे येथील त्याचे घर गाठले. घराला बाहेरून कडी होती, ती उघडताच समोरचे दृश्य पाहून पोलिसांच्या काळजाचा थरकाप उडाला.
advertisement
रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह
घरामध्ये सविता मनोहर कांबळे (वय ३८) या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. त्यांच्या शेजारीच रक्ताने माखलेली लोखंडी हातोडी पडली होती. पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कौटुंबिक वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मुलाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
याप्रकरणी मृताचा मुलगा राजेश मनोहर कांबळे (वय १९) याने आपल्या वडिलांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड आणि उपनिरीक्षक महेश डोंगरे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! "मी पत्नीला संपवलंय.."; भल्या पहाटे मनोहर पोलिसांकडे आला, घराचा दरवाजा उघडताच सगळ्यांचा उडाला थरकाप
Next Article
advertisement
IND vs SA : टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडलं?
टीम इंडियासाठी वाईट बातमी, ड्रेसिंग रूममध्ये सगळ्यांचे चेहरे पडले, नेमकं काय घडल
  • टीम इंडियाला मोठा धक्का

  • सरावा दरम्यान स्टार खेळाडूला दुखापत

  • साऊथ आफ्रिकेविरूद्ध सामन्याआधी टेन्शन वाढलं

View All
advertisement