मुंबईतील अमितचा पुण्यातील तरुणीसोबत मोठा गेम; आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, मग धक्कादायक कांड
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
अमितकुमारने तरुणीला लग्नाचं खोटं आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. विश्वास संपादन केल्यानंतर, त्याने गेल्या दहा महिन्यांत तरुणीकडून वेळोवेळी तब्बल २५ लाख ७६ हजार रुपये उकळले.
पुणे : पुण्यातील वाघोली परिसरात विवाहाचं आमिष दाखवून एका ३३ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. इतकंच नाही तर तिची २५ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचंही उघडकीस आलं आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी मुंबईतील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
प्रकरण काय आहे?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी अमितकुमार कृष्णमोहन गोस्वामी (२८, रा. मालाड, मुंबई) यांची काही काळापूर्वी ओळख झाली होती. अमितकुमारने तरुणीला लग्नाचं खोटं आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. विश्वास संपादन केल्यानंतर, त्याने गेल्या दहा महिन्यांत (एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६) विविध घरगुती आणि वैयक्तिक कारणं सांगून तरुणीकडून वेळोवेळी तब्बल २५ लाख ७६ हजार रुपये उकळले.
advertisement
जेव्हा तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली, तेव्हा आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तरुणीनं आपले पैसे परत मागितले. मात्र, पैसे देण्याऐवजी आरोपीने तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर या छळाला कंटाळून तरुणीने वाघोली पोलीस ठाण्यात धाव घेतली.
advertisement
या तक्रारीवरून पोलिसांनी अमितकुमार गोस्वामी विरुद्ध बलात्कार, फसवणूक आणि धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक थोरात या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. मॅट्रिमोनिअल साईट्स किंवा सोशल मीडियावरून ओळख झालेल्या व्यक्तींना मोठे आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 9:35 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
मुंबईतील अमितचा पुण्यातील तरुणीसोबत मोठा गेम; आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, मग धक्कादायक कांड









