PDCC Bank Bharti 2025: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिक्त जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख किती?

Last Updated:

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अलीकडेच नोकरभरतीची घोषणा करण्यात आली आहे. लिपिक पदासाठी ही नोकर भरती केली जात आहे.

PDCC Bank Bharti 2025: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिक्त जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख किती?
PDCC Bank Bharti 2025: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिक्त जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख किती?
बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकरभरती केली जाणार आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अलीकडेच नोकरभरतीची घोषणा करण्यात आली आहे. लिपिक पदासाठी ही नोकर भरती केली जात आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये केल्या जाणाऱ्या नोकरभरतीची शैक्षणिक पात्रता किती? वयोमर्यादा किती? कोणकोणत्या पदांवर नोकरभरती केली जाणार आहे? जाणून घेऊया...
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये लिपिक पदासाठी 434 जागांवर नोकरभरती केली जाणार आहे. अद्याप नोकरभरतीमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही. 434 पदांसाठी 1 डिसेंबर 2025 पासून अर्जप्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होण्यासाठी बराच काळ अवधी शिल्लक आहे. अर्ज प्रक्रिया 1 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असून 20 डिसेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ https://www.pdcc.bank.in/ येथे भेट द्यावी. दिलेल्या वेबसाईटच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरायचा आहे.
advertisement
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे, शिवाय अर्ज शुल्काची प्रक्रिया देखील ऑनलाईन पद्धतीनेच केली जाणार आहे. ऑनलाईन अर्ज शुल्काची आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख एक सारखीच असणार आहे. दरम्यान, ऑनलाइन परीक्षेची तारीख बँकेच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे. त्याचप्रमाणे, ऑनलाइन परीक्षेचे हॉलतिकिट डाउनलोड करण्याची तारीख, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीसाठीच्या तारखा देखील बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जातील. अर्जदारांसाठीही एक महत्त्वाची माहिती आहे, एकूण रिक्त जागांपैकी 70% जागा पुणे जिल्ह्यात रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी राखीव असणार आहे. तर, उर्वरित 30% पदं पुणे जिल्ह्याबाहेरील उमेदवारांसाठी असणार आहेत. जर पुणे जिल्ह्याबाहेरील पुरेसे पात्र उमेदवार मिळाले नाहीत, तर उर्वरित पदे पुणे जिल्ह्यातील पात्र उमेदवारांमधून भरली जातील.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
PDCC Bank Bharti 2025: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत रिक्त जागांसाठी मेगाभरती, अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख किती?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement