Pune : पुण्यातील चंदननगरममध्ये सिनेस्टाईल फायरिंग, पोलीस पथकावर बेछुट गोळीबार! शनिवारी रात्री काय घडलं?

Last Updated:

Pune Firing Case Chandan Nagar : पुण्यातील चंदननगरमध्ये पोलिसांवर फायरिंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी अवैध पिस्तुलाचा वापर करणाऱ्या आरोपीला एका पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमी केलं आहे.

Pune Police officers injured in Firing
Pune Police officers injured in Firing
Pune Police officers injured in Firing : पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असताना नागरिकांचा संताप वाढला होता. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन काहीही करत नाही, अशी ओरड ऐकायला मिळत होती. अशातच आता पुण्यात पोलीसच सुरक्षित नाही का? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. एखाद्या हिंदी अॅक्शन सिनेमाही फिक्का पडेल, असा प्रकार पुण्यात घडला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांची एकच चर्चा होताना दिसतीये.

कुऱ्हाडीने वाहनांची तोडफोड केली

पुण्यात वाहने तोडफोडीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या चंदननगर पोलिस पथकावर सराईत गुन्हेगाराने पिस्तुलातून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाघोली- आव्हाळवाडी रस्त्यावर शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. ओमकार भंडारे असं गोळीबारात जखमी झालेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपीने कुऱ्हाडीने वाहनांची तोडफोड केली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण होतं. त्यानंतर आरोपी फरार झाले.
advertisement

आरोपीची थेट पोलिसांवर फायरिंग

पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर आरोपी वाघोली परिसरातील आव्हाळवाडी रस्त्यावर भंडारे फिरत असल्याची माहिती चंदननगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी फिल्डिंग लावली. शनिवारी रात्री पोलिसांनी ओमकार भंडारे याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने थेट पोलिसांवर फायरिंग सुरू केली. पोलिसांनी यावेळी स्वरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात आरोपीच्या पायाला गोळी लागली आहे.
advertisement

आरोपीच्या पायाला गोळी

दरम्यान, आव्हाळवाडी रस्त्यावर भंडारे याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या दिशेने आरोपीने गोळीबार केल्याची माहिती परिमंडळ 7 पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली आहे. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्यावर आरोपीच्या पायाला गोळी लागली. जखमी आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी सांगितलं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune : पुण्यातील चंदननगरममध्ये सिनेस्टाईल फायरिंग, पोलीस पथकावर बेछुट गोळीबार! शनिवारी रात्री काय घडलं?
Next Article
advertisement
BMC Election : BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं? Inside Story
BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं?
  • BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं?

  • BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं?

  • BMC मध्ये अजितदादांची एन्ट्री! महायुतीचं मुंबईतलं समीकरण अचानक कसं बदललं?

View All
advertisement