पुणेकरांनो पार्टीचा बेत आखलाय? मुळशी, ताम्हिणी आणि लोणावळ्यातील या प्रसिद्ध ठिकाणांवर आज बंदी
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणेकरांसाठी ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना गडकिल्ल्यांवर होणारी हुल्लडबाजी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी वन विभागाने कंबर कसली आहे.
पुणे : पुणेकरांसाठी ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना गडकिल्ल्यांवर होणारी हुल्लडबाजी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी वन विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील प्रमुख किल्ल्यांवर ३१ डिसेंबरला रात्रीच्या मुक्कामावर कडक बंदी घातली आहे.
कोणत्या किल्ल्यांवर निर्बंध?
जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या सिंहगड, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर आणि राजमाची यांसारख्या किल्ल्यांचा यात समावेश आहे. या ठिकाणी ३१ डिसेंबरच्या संध्याकाळपासूनच पर्यटकांना खाली उतरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेषतः सिंहगडावर संध्याकाळी ५ वाजल्यानंतर वर जाणाऱ्या गाड्या रोखल्या जातील आणि रात्री गडावर कोणालाही थांबता येणार नाही.
वन विभागाची कडक भूमिका:
निसर्गाच्या सानिध्यात नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या बहाण्याने अनेक पर्यटक जंगल क्षेत्रात मद्यपान करणे, डीजेचा गोंगाट करणे किंवा प्लास्टिक कचरा फेकणे असे प्रकार करतात. यामुळे वन्यप्राण्यांना त्रास होतो आणि जंगलात वणवा पेटण्याची भीती असते. हे टाळण्यासाठी वन विभागाने मुळशी, ताम्हिणी, लोणावळा आणि भोर परिसरातील संरक्षित वनक्षेत्रांत गस्त वाढवली आहे.
advertisement
वाहनांची तपासणी आणि गस्त:
view commentsसिंहगड पायथ्याला असलेल्या टोलनाक्यावर प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जाणार आहे. गडावर मद्य किंवा मांस नेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या मोहिमेत वन विभागासोबत स्थानिक 'संयुक्त वन व्यवस्थापन समित्या' आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 12:46 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो पार्टीचा बेत आखलाय? मुळशी, ताम्हिणी आणि लोणावळ्यातील या प्रसिद्ध ठिकाणांवर आज बंदी











