Pune Crime : सर्वांसमोर गोळ्या घातल्या पण गणेश काळेच्या हत्येसाठी वापरला आयुषच्या मर्डरचा 'पॅटर्न', कोंढव्यात काय घडलं?

Last Updated:

Pune Ganesh Kale Murder Case : मयत गणेश काळे हा रिक्षा चालक असून ही घटना आज दुपारी खडी मशीन चौकात घडली. दोन जण गाडीवरून आले आणि गोळीबार केला.

 Ganesh Kale Murder Pattern Same As Ayush komkar murder
Ganesh Kale Murder Pattern Same As Ayush komkar murder
Pune Kondhawa Crime News : पुण्यातील कोंढव्यात पिस्तूलातून गोळ्या झाडून कोयत्याने वार करत एकाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गणेश काळे असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणेश हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खूनातील आरोपी समीर काळे याचा भाऊ असल्याची माहिती समोर येतीये. त्यामुळे या खूनाला टोळी युद्धाची किनार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. सोमनाथ गायकवाड टोळीने गेल्या वर्षीय वनराज यांचा गोळ्या झाडून, कोयत्याने वार करत खून केला होता. वनराज यांच्या खूनात वापरलेली पिस्तूले समीर काळे याने मध्य प्रदेशातून आणल्याचे पोलीस तपासात पुढे आलं होतं. अशातच आता आंदेकरांचं संपूर्ण कुटुंब तुरूंगात असताना बाहेर गँग ऑपरेट कोण करतंय? असा सवाल विचारला जात आहे.

खडी मशीन चौकात काय घडलं? 

मयत गणेश काळे हा रिक्षा चालक आहे. गणेश येवलेवाडी परिसरात रहायला होता. ही घटना आज दुपारी खडी मशीन चौकात घडली. दोन जण गाडीवरून आले आणि गोळीबार केला. त्यानंतर मागून एक दुचाकी देखील आली होती. पुढच्या गाडीवर असलेल्या दोघा जणांनी गणेश काळेवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर चौघंही घटनेनंतर फरार झाले. हाच पॅटर्न आयुष कोमकरच्या हत्येवेळी पहायला मिळाला होता. आयुषवर दोघांनी गोळीबार केला तर दोघंजण गाडीवर मागे थांबलेले होते. गणेश काळेवर चार गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
advertisement

गणेश काळेच्या हत्येचा पॅटर्न सेम

गणेश काळेवर हल्लेखोरांनी सलग सहा गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर खात्री करण्यासाठी त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. आयुष कोमकरच्या प्रकरणात देखील असंच पहायला मिळालं होतं. त्यामुळे या प्रकरणाला गँगवॉ़रची किनार आहे का? असा सवाल विचारला जात आहे. आंदेकर टोळीकडून आयुष कोमकरची हत्या करण्यात आल्यानंतर टोळी प्रमुख बंडू आंदेकरसह अनेकांना अटक करण्यात आली होती. मात्र, तरीही आंदेकर टोळी सक्रिय असल्याचं या हत्येतून दिसून आलं आहे.
advertisement

पुणे पोलिसांवर अनेक प्रश्नचिन्ह

दरम्यान, वनराज आंदेकरच्या हत्येवेळी समीरसह आबा खोंड, आकाश म्हस्के आणि संगम वाघमारे या चौघांनी मिळून 9 पिस्तुले धुळेमार्गे मध्यप्रदेशातून आणल्याची माहिती तपासात समोर आली होती. अशातच आता समीर काळेच्या भावाचा गेम वाजवण्यात आल्याने पुणे पोलिसांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : सर्वांसमोर गोळ्या घातल्या पण गणेश काळेच्या हत्येसाठी वापरला आयुषच्या मर्डरचा 'पॅटर्न', कोंढव्यात काय घडलं?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement