Pune : बंडूचा 'शातीर गेम' कामी आला! लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर पुन्हा तुरुंगाबाहेर येणार, पण कारण काय?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Gang War : पुणे महापालिकेत सध्या राजकीय हालचालींना वेग आला असून कोल्हापूरच्या कारागृहात असलेल्या दोन नगरसेविका पुन्हा एकदा शहरात परतण्याची शक्यता आहे.
Pune PMC Election (अभिजित पोटे, प्रतिनिधी) : आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरूंगात असलेल्या आंदेकर फॅमिलीला मोठा दिलासा मिळाला आहे. नगरसेवक लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघी सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांना बाहेर आणण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणात कट रचल्याच्या गंभीर आरोपामुळे या दोघींची रवानगी कारागृहात करण्यात आली होती, मात्र आता राजकीय कारणास्तव त्यांना बाहेर आणण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर राबवली जात आहे.
कोठडीतून बाहेर येण्याची परवानगी
पुणे महानगरपालिकेच्या आगामी महापौर निवडीच्या मतदानासाठी या दोघींना विशेष परवानगी देण्याची तयारी सध्या सुरू आहे. या महत्त्वाच्या निवडणुकीत प्रत्येक मत मोलाचे असल्याने, आपल्या नगरसेविकांना मतदानासाठी उपस्थित राहता यावे, यासाठी राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. या प्रक्रियेअंतर्गत कायदेशीर बाबी तपासून त्यांना काही तासांसाठी किंवा दिवसासाठी कोठडीतून बाहेर येण्याची परवानगी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
advertisement
बंडू आंदेकरचा शातिर गेम
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवकांकडून कोल्हापूर कारागृह प्रशासनाला या संदर्भात एक अधिकृत पत्र पाठवण्यात येणार आहे. या पत्राद्वारे लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना महापौर निवडीच्या विशेष सभेला उपस्थित राहण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली जाणार आहे. जेलमधून सुटण्यासाठी कायद्याची चोख माहिती असलेल्या बंडू आंदेकरने निवडणूक लढवण्याचा शातिर गेम खेळला होता.
advertisement
बंडू आंदेकरचा प्लॅन यशस्वी
दरम्यान, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघीही सध्या आयुष कोमकर खून प्रकरणात कोल्हापूर कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. याआधीही महत्त्वाच्या मतदान प्रक्रियेसाठी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात बाहेर आणण्यात आले होते.आता पुन्हा एकदा, महापौर-उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर आंदेकर भगिनींना सभेसाठी बोलावले जाणार असल्याने बंडू आंदेकरचा प्लॅन यशस्वी झाल्याचं चित्र पहायला मिळतंय.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 9:12 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune : बंडूचा 'शातीर गेम' कामी आला! लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर पुन्हा तुरुंगाबाहेर येणार, पण कारण काय?










