Pune Ganpati : पुण्यात गणरायाच्या आगमनाची धूम! मानाच्या 5 गणपतींची प्राणप्रतिष्ठा त्यांच्या हस्ते पार पडणार, वेळ जाहीर
- Published by:Tanvi
- local18
- Reported by:Brajesh Kumar Singh
Last Updated:
Pune Manache Ganpati Pratishthapana Time : पुण्यातील गणेशोत्सवासाठीची उलटी गिनती सुरू झाली असून मानाच्या पाच गणपतींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची वेळ जाहीर झाली आहे. पुणेकरांसाठी गणरायाचे आगमन ही वर्षातील सर्वात मोठी पर्वणी मानली जाते.
प्रतिनिधी-अभिजीत पोते, पुणे
पुणे : पुण्यातील पाच मानाच्या गणपतींच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाची वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक गणपतीच्या आगमनासाठी वेगवेगळ्या वेळापत्रकानुसार मिरवणूक आणि विधी पार पडतील. या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात भक्तांसाठी धार्मिक विधी, प्रभात बँड आणि ढोल-ताशा वादन यांचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामुळे उत्सवाचे औचित्य अधिक वाढेल.
मानाचा पहिला कसबा गणपती :
मानाचा पहिला गणपती, कसबा गणपती याची आगमन मिरवणूक सकाळी ८ वाजता सुरू होईल. या मिरवणुकीत प्रभात बँड पथकासोबत ढोल-ताशा पथकही वादन करेल. त्यानंतर, सकाळी 11:37 वाजता, गणपतीची प्राणप्रतिष्ठा आध्यात्मिक गुरु आणि लेखक स्वामी सवितानंद यांच्या हस्ते संपन्न होईल.
advertisement
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळ :
यंदाचे हे मंडळाचे 133 वे वर्ष आहे. आगमन मिरवणूक सकाळी 10 वाजता नारायण पेठेतील केळकर रस्त्यावरून निघणार आहे. दुपारी 12:11 वाजता सनई-चौघड्याच्या साथीत प्राणप्रतिष्ठापना प.पू. योगश्री श्री शरदशास्त्री जोशी यांच्या हस्ते होईल. यंदा साडेतीन शक्तीपीठांपैकी पहिल्या प्रतिकृतीसाठी कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती मंडळाकडून साकारण्यात आली आहे.
advertisement
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ :
पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे यंदाचे 139 वे वर्षे असून बापाच्या आगमनाची मिरवणूक आकर्षक फुलांच्या रथातून बुधवारी सकाळी 11 वाजता सुरू होईल. प्रतिष्ठापना दुपारी 2:35 वाजता संपन्न होणार आहे.
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळ :
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळाचे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षे असून बुधवारी दुपारी 12.15 वाजता आळंदी देवस्थानाचे प्रमुख विश्वस्त निरंजन नाथ महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. तुळशीबाग मंडळाकडून यंदा मथुरेचे वृंदावन साकारले आहे.
advertisement
मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा :
सकाळी 9 वाजता पारंपरिक वाद्यांच्या गजरात मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा गणपतीची मिरवणूक सुरुवात होईल. सकाळी 10 ते 11 यावेळेत रोहित टिळक यांचे पुत्र रौनक टिळक यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली जाईल. सकाळी 11 वाजता बाप्पाच्या महाआरतीचे नियोजन करण्यात आले आहे.
दगडूशेठ हलवाई गणपती आगमन
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची आगमन मिरवणूक सकाळी 7 वाजता सुरू होईल. या मिरवणुकीत पारंपरिक ढोल-ताशा आणि प्रभात बँड वादन करतील, ज्यामुळे भक्तांना उत्सवाचा रंग आणि भक्तिभाव अनुभवायला मिळेल. मिरवणूक रस्त्यावरून मार्गक्रमण करत मंदिरात पोहोचेल, जिथे गणपतीची प्राणप्रतिष्ठा आयोजित करण्यात आली आहे. श्रींची प्राणप्रतिष्ठा बुधवारी सकाळी 11.11 वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यात धार्मिक विधी, आरती आणि भक्तिमय कार्यक्रमांचा समावेश असेल, ज्यामुळे भक्तांसाठी एक आध्यात्मिक अनुभव घडेल. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन भक्तांच्या सोयीसाठी आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आले आहे, ज्यामुळे उत्सवाचा आनंद द्विगुणीत होईल.
advertisement
पुण्यातील गणपतींची प्राणप्रतिष्ठा यांच्या हस्ते पार पडणार
1) मानाचा पहिला
ग्रामदैवत श्री कसबा गणपती
प्राणप्रतिष्ठापनाची वेळ : सकाळी 11 वाजून 37 मिनिटे
हस्ते : स्वामी सवितानंद
2) मानाचा दुसरा
श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ
प्राणप्रतिष्ठेची वेळ: दुपारी 12 वाजून 15 मिनिटे
हस्ते: योगेश्री शरद शास्त्री जोशी
3) मानाचा तिसरा
श्री गुरुजी तालीम गणपती
advertisement
प्राणप्रतिष्ठापनाची वेळ : दुपारी 2 वाजून 35 मिनिटे
4) मानाचा चौथा
तुळशीबाग गणपती
प्राणप्रतिष्ठापनेची वेळ : दुपारी 12 वाजून 15 मिनिटे
हस्ते: योगी निरंजननाथ
5) मानाचा पाचवा
केसरी वाडा गणपती
प्राणप्रतिष्ठापनेची वेळ : सकाळी 10 वाजता हस्ते: रोनक टिळक
6) दगडूशेठ हलवाई गणपती
प्राणप्रतिष्ठापनेची वेळ : सकाळी 11 वाजून 11 मिनिटे
advertisement
हस्ते : श्री झालरिया पिठाधीश्वर स्वामी घनशामचार्य महाराज
7) अखिल मंडई गणपती
प्रतिष्ठापनेची वेळ : दुपारी 12 वाजता
हस्ते: नविन चंद्र मेनकर व स्नेहल मेहनकर
8) श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती
प्राणप्रतिष्ठापनाची वेळ: दुपारी 12 वाजता
हस्ते: जया किशोरी
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2025 8:22 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Ganpati : पुण्यात गणरायाच्या आगमनाची धूम! मानाच्या 5 गणपतींची प्राणप्रतिष्ठा त्यांच्या हस्ते पार पडणार, वेळ जाहीर


