पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, रविवारी पहाटे तीनपासूनच धावणार मेट्रो, पाहा वेळापत्रक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Sherkar
Last Updated:
Pune Metro: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ‘रन फॉर युनिटी’साठी रविवारी पहाटे 3 वाजलेपासूनच मेट्रो धावणार आहे.
पुणे: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रोज सकाळी सहा वाजता सुरू होणारी मेट्रो रविवारी पहाटे 3 पासूनच धावणार आहे. पुणे शहरात 2 नोव्हेंबर रोजी, राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार असल्याने, नागरिकांच्या सोयीसाठी पुणे मेट्रोची सेवा पहाटेच सुरू करण्यात येणार आहे.
पुण्यात रोज सकाळी सहा वाजता सुरू होणारी मेट्रो सेवा, या विशेष दिवशी पहाटे तीन वाजल्यापासूनच सुरू होणार आहे. दोन नोव्हेंबरच्या पहाटे तीनपासून ते सहा वाजेपर्यंत दोन्ही मार्गांवर पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी प्रत्येक 15 मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे. त्यानंतर सकाळी सहा वाजल्यापासून मेट्रोचे नियमित वेळापत्रक सुरू राहील.
advertisement
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त देशभरात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याच निमित्ताने ‘पुणे रन फॉर युनिटी’ महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमात हजारो पुणेकर सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात ‘रन फॉर युनिटी’च्या उपक्रमांद्वारे राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला जातो. पुण्यातील एस. पी. कॉलेज मैदानातून सुरू होणारी ही महामॅरेथॉन शहरातील विविध भागातून धावणार आहे.
advertisement
दरम्यान, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पुणे महा मेट्रो कडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 01, 2025 8:28 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, रविवारी पहाटे तीनपासूनच धावणार मेट्रो, पाहा वेळापत्रक


