Pune-Mumbai Railway : पुणे-मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट; रेल्वेचा मोठा निर्णय आणि लोणावळ्यात...
Last Updated:
Pune-Mumbai Railway Update : पुणे-मुंबई रेल्वे मार्गाचा लोणावळा सेक्शन आता पूर्ण झाला आहे. प्रवाशांसाठी आता प्रवास जलद आणि आरामदायक होणार आहे. रेल्वे विस्तारामुळे दोन्ही शहरांदरम्यानचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर झाला आहे.
पुणे-मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी आता आनंदाची बातमी आहे. लोणावळा स्थानकाचे यार्ड रिमॉडेलिंग आणि रिसेप्शन-डिस्पॅच लाइनचे विस्तार पूर्ण झाले आहेत. यामुळे प्रवासी गाड्यांना मालगाड्यांसाठी थांबावे लागणार नाही.
कोणते काम करण्यात आले?
लोणावळा स्थानकावरील लोहमार्गाची लांबी सुमारे 150 मीटरने वाढवण्यात आली आहे तसेच दोन नवीन लूप लाईन्स सुरू केल्या गेल्या आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्यांची हाताळणी आता जलद, सुरक्षित आणि सोपी झाली आहे. या सुधारणामुळे मुख्य लाइनवर प्रवासी गाड्यांसाठी मार्ग मोकळा राहतो तर मालगाड्यांसाठी स्वतंत्र लूप लाइन आहे.
यार्डमधील अप आणि डाउन मार्गिकांची लांबीही वाढवण्यात आली आहे. आधी 700 मीटर असलेली मार्गिका आता 850 मीटरपेक्षा जास्त झाली आहे, त्यामुळे मोठ्या मालगाड्या बँकरसह सहज मार्गिकेत येऊ शकतात. आधी पुणे-मुंबई मार्गावर मालगाड्यांमुळे प्रवासी गाड्यांना 15-20 मिनिटे थांबावे लागायचे. आता ही थांबण्याची गरज नाही.
advertisement
बँकर जोडण्यासाठीही वेळ वाचेल. आधी बँकर लावणे किंवा काढण्यासाठी 15-20 मिनिटे लागत असत, पण नवीन लूप लाइन मुळे मालगाड्यांवर बँकर लगेच लावता येईल. त्यामुळे मुख्य लाइन फक्त प्रवासी गाड्यांसाठी खुली राहील. या सुधारणामुळे लोणावळा स्थानकावरील मालवाहतूक जलद होईल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल. प्रवास आता अधिक आरामदायक आणि सुरक्षित होईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 16, 2025 11:18 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune-Mumbai Railway : पुणे-मुंबई-पुणे प्रवास आता सुसाट; रेल्वेचा मोठा निर्णय आणि लोणावळ्यात...











