Pune News : पुणे बनणार भारताची सायकल राजधानी! महापालिकेचा मोठा निर्णय, कसा आहे मेगा प्लॅन?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
एकेकाळी ‘सायकल सिटी’ म्हणून ओळखले जाणारे पुणे पुन्हा त्या जुन्या ओळखीला उजाळा देण्यासाठी सज्ज होत आहे. शहरभर 75 किलोमीटर लांबीचे सायकल मार्गांचे जाळे उभारण्याचा मानस पुणे महानगरपालिकेने व्यक्त केला आहे.
पुणे : एकेकाळी ‘सायकल सिटी’ म्हणून ओळखले जाणारे पुणे पुन्हा त्या जुन्या ओळखीला उजाळा देण्यासाठी सज्ज होत आहे. शहरभर 75 किलोमीटर लांबीचे सायकल मार्गांचे जाळे उभारण्याचा मानस पुणे महानगरपालिकेने व्यक्त केला आहे. अलीकडेच शनिवारवाडा ते सिंहगड या मार्गावर आयोजित ‘हिंदआयन बाइक अँड हाइक’ या सायकल मोहिमेचा समारोप मोठ्या उत्साहात पार पडला. या मोहिमेत टेरिटोरियल आर्मी, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, भारतीय वायुदल, तसेच पुणे महानगरपालिका सायकल क्लब आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.
पुणे पुन्हा बनणार ‘भारताची सायकल राजधानी’
पुणे पुन्हा एकदा ‘सायकल शहर’ म्हणून ओळख मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. महानगरपालिकेच्या 75 किलोमीटर लांबीच्या सायकल मार्गांच्या उपक्रमाद्वारे शहरभर सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक प्रवासाची संधी निर्माण केली जाणार आहे. हा उपक्रम 2026 मध्ये होणार आहे.
advertisement
यावेळी महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितलं की, पुणे हे आपल्या समृद्ध सायकल संस्कृतीसाठी ओळखले जाते. आता ही परंपरा पुन्हा जिवंत करून पुण्याला ‘भारताची सायकल राजधानी’ बनविण्याची वेळ आली आहे. हा उपक्रम केवळ सायकलिंगचा आनंद नाही, तर नागरिकांच्या फिटनेससाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठीही महत्त्वाचा आहे. आयुक्तांनी असेही सांगितले की, भविष्यात या सायकल मार्गांचा विस्तार करून शहरात अधिक सुरक्षित, सुसंगत आणि सुलभ सायकल नेटवर्क तयार करणे ही महानगरपालिकेची महत्त्वाकांक्षी योजना आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 16, 2025 2:51 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : पुणे बनणार भारताची सायकल राजधानी! महापालिकेचा मोठा निर्णय, कसा आहे मेगा प्लॅन?