advertisement

पार्थनं कानामागं पिस्तुल लावला अन्...आवाजानं अख्खी सोसायटी हादरली; पुण्याच्या नांदेड सिटीत धक्कादायक घडलं

Last Updated:

पुण्यातील अत्यंत सुरक्षित आणि पॉश मानल्या जाणाऱ्या 'नांदेड सिटी' परिसरात एक खळबळजनक घटना घडली.

तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली (प्रतिकात्मक फोटो)
तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुण्यातील अत्यंत सुरक्षित आणि पॉश मानल्या जाणाऱ्या 'नांदेड सिटी' परिसरात एक खळबळजनक घटना घडली. यात एका २१ वर्षीय तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पार्थ बापू गोरे (वय २१) असे या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या घटनेने नांदेड सिटी परिसरासह संपूर्ण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. तरुण वयात त्याने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्थ नांदेड सिटीतील 'आसावरी' इमारतीत आपल्या मामांकडे वास्तव्यास होता. मंगळवारी (१० मार्च) सकाळी या सदनिकेत पार्थने पिस्तुलातून स्वतःच्या कानाच्या मागील बाजूस गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांची धावपळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी पार्थला तत्काळ रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटना इतकी भीषण होती, की उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला.
advertisement
घटनास्थळावरून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. मात्र, पार्थकडे हे पिस्तूल आले कुठून आणि त्याने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे गुपित अद्याप गुलदस्त्यातच आहे. पार्थच्या कुटुंबीयांकडे आणि नातेवाईकांकडे पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे. नैराश्य की अन्य काही कारण? याचा तपास आता नांदेड सिटी पोलीस करत आहेत. या घटनेमुळे नांदेड सिटीतील सुरक्षा व्यवस्था आणि तरुणांमधील वाढत्या मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पार्थनं कानामागं पिस्तुल लावला अन्...आवाजानं अख्खी सोसायटी हादरली; पुण्याच्या नांदेड सिटीत धक्कादायक घडलं
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement