पुणे विद्यापीठात प्राध्यापक भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची संधी, तारीख आली जवळ
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नोकरभरती केली जाणार आहे. अनुभवी उमेदवारांसाठी ही भरती विद्यापीठामध्ये केली जाणार आहे.
शिक्षक पेशामध्ये करियर करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नोकरभरती केली जाणार आहे. अनुभवी उमेदवारांसाठी ही भरती सावित्रिबाई फुले विद्यापीठामध्ये केली जाणार आहे. इच्छुक शिक्षक उमेदवार या नोकरभरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. 111 रिक्त पदांसाठी ही नोकरभरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची मुदत रविवारपर्यंत (दि. 7 डिसेंबर) होती. या नोकरभरतीला मुदतवाढ मिळाली असून, आता दि. २१ डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. नोकरभरतीला मिळालेल्या मुदतवाढीची माहिती प्रभारी कुलसचिव प्रा. ज्योती भाकरे यांनी दिली आहे.
विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांमधील शासनमान्य सहायक प्राध्यापक 47, सहयोगी प्राध्यापक 32 आणि प्राध्यापक 32 अशा एकूण 111 रिक्त शिक्षकी पदांच्या भरतीची ही प्रक्रिया सुरू आहे. पूर्व नियोजनानुसार ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया दि. 8 नोव्हेंबर ते दि. 7 डिसेंबर दरम्यान राबविली जाणार होती. त्यानंतर अर्जाची प्रत आणि संबंधित कागदपत्रे प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करण्यासाठी दि. 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 पर्यंत मुदत दिलेली होती. परंतु, सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून या नोकर भरतीची शेवटची तारीख बदलण्यात आली आहे. 7 डिसेंबरच्या ऐवजी 21 डिसेंबर ही आता शेवटची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
advertisement
ऑनलाइन पद्धतीने अर्ज केलेल्या उमेदवारांना अर्जाची प्रत आणि संबंधित कागदपत्रे प्रशासन शिक्षक कक्षाकडे सादर करण्यासाठी 26 डिसेंबर सायंकाळी सहापर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, 13 सप्टेंबर 2024च्या जाहिरातीनुसार अर्ज केलेल्या उमेदवारांना 21 डिसेंबरपर्यंत त्यांच्या अर्जामध्ये बदल किंवा सुधारणा करता येऊ शकणार आहेत. या मुदतीमध्ये नवीन उमेदवारदेखील अर्ज करू शकतील, असे विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी स्पष्ट केले आहे. जर तुम्ही अजूनही ऑनलाईन अर्ज भरला नसेल, तर लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. या तिनही पदांची जाहिरात सुद्धा बातमीमध्ये देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी व्यवस्थित जाहिरात वाचूनच अर्ज करायचा आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 14, 2025 7:18 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणे विद्यापीठात प्राध्यापक भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची संधी, तारीख आली जवळ










