Pune News : ऐन दिवाळीत खळदकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर, मुक्या जनावरला वाचवताना नवरा बायकोचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पुण्याच्या दौड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मुक्या जनावराला वाचवायला गेलेल्या पती पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजाराम खळदकर आणि त्यांची पत्नी मनीषा राजाराम खळदकर अशी या दोघांची नावे आहेत.
Pune News : पुण्याच्या दौड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मुक्या जनावराला वाचवायला गेलेल्या पती पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजाराम खळदकर आणि त्यांची पत्नी मनीषा राजाराम खळदकर अशी या दोघांची नावे आहेत.या घटनेने खळदकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दौंडच्या नानगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
दौंड तालुक्यातील नानगाव मध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शेळीला वाचविण्यासाठी गेलेल्या
मनीषा राजाराम खळदकर या महिलेला विजेचा शॉक बसला. त्यानंतर आपल्या पत्नीला वाचवायला गेलेल्या राजाराम खळदकर यांना देखील शॉक लागल्याने, या घटनेत शेळी, पत्नी आणि पती असा तिघांचाही मृत्यू झाला आहे.अचानक घडलेल्या घटनेमुळे गावावर शोककळा पसरलीय.
राजाराम खळदकर आणि त्यांची पत्नी मनीषा राजाराम खळदकर या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. इलेक्ट्रिक मोटारीच्या पॅनल बॉक्सला वीज उतरल्याने तेथे चरत असलेली राजाराम खळदकर यांची शेळी त्या पॅनलला चिकटली.तिला वाचवायला मनीषा खळदकर गेल्या मात्र त्याही या पॅनल बॉक्सला चिकटल्या. हे सर्व दृश्य पाहून राजाराम खळदकर हे आपल्या पत्नीला वाचवायला धावत गेले मात्र ते सुद्धा या ठिकाणी चिकटून बसले. या दुर्दैवी घटनेत शेळी तसेच पत्नी मनीषा खळदकर आणि पती राजाराम खळदकर यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेने खळदकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तसेच या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 22, 2025 11:55 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : ऐन दिवाळीत खळदकर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर, मुक्या जनावरला वाचवताना नवरा बायकोचा मृत्यू, नेमकं काय घडलं?