Pune Crime: मालकाच्या डायरीतून चोरला 'तो' पासवर्ड; मग पुण्यातील ऑफिस बॉयचं धक्कादायक कांड
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
या कार्यालयात काम करणाऱ्या ऑफिसबॉयने मालकाचा विश्वास संपादन केला होता. त्याने मालकाच्या नजरेतून सुटून त्यांच्या खासगी डायरीतील लॉकरचा 'पासवर्ड' चोरून मिळवला
पुणे : पुण्यातील उच्चभ्रू कोरेगाव पार्क परिसरात एका विश्वासू ऑफिसबॉयनेच मालकाच्या लॉकरवर डल्ला मारत लाखोंचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालकाच्या खासगी डायरीतून पासवर्ड चोरून या नोकराने १७ हजार ५०० अमेरिकन डॉलर्स (अंदाजे १४ लाख रुपये) आणि ११ लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे.
नेमकी घटना काय?
कोरेगाव पार्क येथील गल्ली क्रमांक सहामधील 'प्रिसियस जेम सोसायटी'मध्ये फिर्यादी यांचे खासगी कार्यालय आहे. या कार्यालयात काम करणाऱ्या ऑफिसबॉयने मालकाचा विश्वास संपादन केला होता. त्याने मालकाच्या नजरेतून सुटून त्यांच्या खासगी डायरीतील लॉकरचा 'पासवर्ड' चोरून मिळवला. पासवर्ड हाती लागताच त्याने कार्यालयातील आणि मालकाच्या घरी असलेल्या लॉकरमधून वेळोवेळी मोठी रक्कम चोरली.
advertisement
लाखो रुपयांची परदेशी चलन आणि कॅश लंपास: काही दिवसांनंतर लॉकरमधील रकमेत घट झाल्याचे मालकाच्या लक्षात आले. त्यांनी तपासणी केली असता, तब्बल १७ हजार ५०० अमेरिकन डॉलर्स आणि ११ लाख रुपयांची भारतीय रोकड गायब असल्याचे दिसून आले. हा प्रकार ऑफिसबॉयनेच केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ४६ वर्षीय व्यावसायिकाने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात धाव घेतली.
advertisement
आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू: याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, गुन्हा घडल्यापासून आरोपी ऑफिसबॉय फरार आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत. घरातील किंवा कार्यालयातील नोकरांची माहिती पोलिसांकडे नोंदवणे आणि पासवर्डसारख्या संवेदनशील गोष्टी गोपनीय ठेवणे किती गरजेचे आहे, हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 11, 2026 7:56 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime: मालकाच्या डायरीतून चोरला 'तो' पासवर्ड; मग पुण्यातील ऑफिस बॉयचं धक्कादायक कांड








