Pune Pmpml: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांचे हाल! PMPच्या 2 हजार फेऱ्या रद्द, हे महत्त्वाचं बसस्थानकही आज बंद
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
शहरातील मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्यामुळे पीएमपीच्या (PMPML) सुमारे दोन हजार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पुणे : पुणे शहरात आयोजित 'पुणे ग्रँड चॅलेंज टूर' या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा सोमवारी (१९ जानेवारी) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. शहरातील मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्यामुळे पीएमपीच्या (PMPML) सुमारे दोन हजार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, दीडशेहून अधिक बसचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
वाहतुकीत झालेले मोठे बदल: सायकल स्पर्धेच्या 'प्रोलॉग' शर्यतीसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत फर्ग्युसन महाविद्यालय (FC) रस्ता, जंगली महाराज (JM) रस्ता आणि गणेशखिंड रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत. यामुळे या मार्गांवरून धावणाऱ्या अडीच हजार फेऱ्यांपैकी बहुतांश फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. तसेच, या भागातील महत्त्वाचे 'डेक्कन बसस्थानक' देखील या कालावधीत बंद ठेवण्यात आले आहे.
advertisement
स्पर्धेचा मार्ग आणि पर्यायी व्यवस्था: ही स्पर्धा खंडुजीबाबा चौक, गुडलक चौक, रेंजहिल्स, संचेती चौक आणि बालगंधर्व मार्गे जाणार आहे. या बंदमुळे प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून पीएमपी प्रशासनाने दीडशे बसचे मार्ग वळवले आहेत. मात्र, तरीही दोन हजार फेऱ्या रद्द झाल्याने चाकरमानी आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
advertisement
जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित या जागतिक दर्जाच्या स्पर्धेमुळे पुण्याचे नाव क्रीडा क्षेत्रात गाजणार असले, तरी सोमवारच्या कामाच्या दिवशी रस्ते बंद असल्याने शहराच्या मध्यभागात वाहतुकीचा मोठा पेच निर्माण झाला आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 7:18 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Pmpml: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांचे हाल! PMPच्या 2 हजार फेऱ्या रद्द, हे महत्त्वाचं बसस्थानकही आज बंद






