Pune Station Update : पुणे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकीटासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही; काय आहे रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Last Updated:

Indian Rail Update : प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना तिकीट खिडकीवर तासन्‌तास रांगेत उभे राहण्याची गरज नाही. प्रवासी आता त्यांच्या मोबाइलवरून थेट तिकीट खरेदी करू शकतात

News18
News18
पुणे : सण आणि उत्सवांच्या काळात आपल्या गावी जाण्यासाठी प्रवाशांना तासन्‌तास तिकीट खिडकीवर उभे राहावे लागते. मात्र, आता रेल्वे प्रशासनाने पुणे स्थानकावर पहिल्यांदाच 'एम-यूटीएस' अर्थात (मोबाइल युनिफाइड टिकेटिंग सिस्टम) सेवा सुरू केली आहे. याद्वारे प्रवाशांना अवघ्या 10 ते 12  सेकंदात जनरल तिकीट मिळेल, आणि तिकीटसाठी लांब रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही.
रेल्वे प्रशासनाने 'एम-यूटीएस' मशीन तिकीट निरीक्षक आणि बुकिंग क्लार्ककडे ठेवले आहेत. प्रवाशांना फक्त त्यांच्या प्रवासाचे स्थानक सांगावे लागेल आणि मशीनद्वारे त्वरित छापील तिकीट दिले जाईल. हे मशीन छोटे प्रिंटरसह येते, जे थेट तिकीट छापण्याची सुविधा देते.
पुणेसह देशातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी खूप जास्त असते. दिवाळी, छठ पूजा, नाताळ आणि इतर सणांच्या वेळी ही गर्दी अधिक वाढते. अशा वेळी रेल्वे प्रशासन अतिरिक्त रेल्वे सोडते, पण तिकीटसाठी तासन्‌तास रांगेत थांबावे लागते. हे लक्षात घेऊन 'एम-यूटीएस' सुविधा महत्त्वाच्या स्थानकांवर सुरू केली जात आहे.
advertisement
प्रवाशांचा फायदा
'एम-यूटीएस' मुळे प्रवाशांना एटीव्हीएम किंवा तिकीट काउंटरच्या रांगेत उभे राहावे लागणार नाही. त्यामुळे त्यांचा मोठा वेळ वाचतो. ज्यांना मोबाईलवर तिकीट दाखवणे सोयीचे वाटत नाही, त्यांच्यासाठी प्रिंटेड तिकीट मिळवण्याचा एक सोपा मार्ग उपलब्ध आहे. ही सेवा फिरती असून, कुठेही तिकीट मिळवणे शक्य आहे.
तिकीट कसे मिळेल?
प्रवाशांना स्थानकावरील बुकिंग ऑफिस, फलाट किंवा स्थानक परिसरातच तिकीट मिळेल. यासाठी कोणतेही अँप वापरण्याची आवश्यकता नाही. बुकिंग क्लार्क किंवा तिकीट निरीक्षक आपल्या जवळ असलेल्या 'एम-यूटीएस' मशिनद्वारे त्वरित तिकीट उपलब्ध करतील. पुणे स्थानकावर ही सुविधा लवकरच सुरु होत असून, प्रवाशांच्या वेळेची बचत होईल आणि गर्दीच्या काळात प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Station Update : पुणे प्रवाशांसाठी खुशखबर! तिकीटासाठी रांगेत थांबण्याची गरज नाही; काय आहे रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement