पुणेकर सावधान! पुढील 2 दिवस धोक्याचे, पुन्हा धो धो बरसणार, पाहा काय आहे अलर्ट?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Shivani Dhumal
Last Updated:
पुणे आणि परिसरात आजपासून पुढील 48 तास विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे: राज्यात मान्सून सक्रीय झाला असून कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार बरसत आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. शनिवारी शहरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरुप आले. आता पुढील 48 तासांत पुन्हा पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुण्यात शनिवारी सायंकाळी झालेल्या पावसानं पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. पुण्यातील रस्ते पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळालं. वाहतुकीच्या समस्यांना देखील पुणेकरांना सामोर जावं लागलं. तसेच काही ठिकाणी घरांत पाणी घुसल्याचं आणि झाडपडीच्या घटनाही झाल्या. अशा परिस्थितीतच पुण्यात येत्या 48 तासात पुन्हा पाऊस बरसणार आहे. त्यामुळे पुणेकरांना घराबाहेर पडण्यापूर्वी योग्य ती काळजी घ्यावी लागणर आहे.
advertisement
पुण्यातील या भागात होणार पाऊस
पुण्यातील खराडी, रामवाडी, विमाननगर, पुण्यातील पेठा, शिवाजीनगर, पिंपरी, चिंचवड, सिंहगड रोड या ठिकाणी येत्या 48 तासात पावसाचा इशारा दिला आहे. पुणे आणि परिसरात आजपासून पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून त्यानंतर 10 तारखेपासून त्याची तीव्रता वाढून मुसळधार सरी कोसळतील. पुण्यात सध्या तरी ढगाळ वातावरणच राहील.
advertisement
दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यामध्ये 50 ते 60 किमी वेगाने वादळी वाऱ्याचा पाऊस पडेल. असा अंदाज आहे. या जोरदार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटना शक्य असल्याने पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
June 09, 2024 8:35 AM IST

