advertisement

पुणेकर पाणी जपून वापरा, ऐन उन्हाळ्यात पुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं? पाहा सविस्तर

Last Updated:

Pune Water Supply: पुणे महापालिका प्रशासनाने 2 दिवस पाणी जपून वापरण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

पुणेकर पाणी जपून वापरा, ऐन उन्हाळ्यात पुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं? संपूर्ण माहिती
पुणेकर पाणी जपून वापरा, ऐन उन्हाळ्यात पुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं? संपूर्ण माहिती
पुणे: पुणेकरांना ऐन उन्हाळ्यात पाणी जपून वापरावं लागेल. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाच्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मंगळवार, 24 मार्च रोजी पुणे विद्यापीठ चौक परिसरात दुरुस्तीचे काम होईल. त्यामुळे शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
दुरुस्तीच्या कामादरम्यान जलवाहिनीवर तांत्रिक कामे करण्यात येणार असल्यामुळे पाण्याचा दाब कमी होऊ नये आणि काम सुरक्षितरीत्या पूर्ण व्हावे यासाठी पाणीपुरवठा थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाढती पाण्याची गरज लक्षात घेता मुख्य जलवाहिन्यांची देखभाल व दुरुस्ती वेळोवेळी करणे आवश्यक असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
advertisement
या भागात पुरवठा बंद
24 मार्च रोजी सेनापती बापट रोड (डावी व उजवी बाजू), आशानगर, गोखले नगर, बहिराटवाडी, भोसले नगर, कासारकर वाडी, औंध-बाणेर परिसर, मॉडर्न कॉलेजच्या बाजूचा परिसर, मॉडेल कॉलनी, चिखलवाडी तसेच बोपोडी या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या परिसरातील नागरिकांना दिवसभर पाण्याची अडचण जाणवू शकते, त्यामुळे आवश्यक तेवढे पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
दरम्यान, दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवार, 25 मार्च रोजी वरील सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्ववत आणि सुरळीत सुरू करण्यात येणार आहे. काम वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाकडून विशेष नियोजन करण्यात आले असून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची काळजी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेची देखभाल करण्यासाठी अशा दुरुस्तीच्या कामांना नागरिकांनी सहकार्य करावे, असेही प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकर पाणी जपून वापरा, ऐन उन्हाळ्यात पुरवठा बंद राहणार, कधी आणि कुठं? पाहा सविस्तर
Next Article
Maharashtra Kesari : 'महाराष्ट्र केसरी' विजेत्यावर बक्षिसांचा पाऊस, रोख रक्कम अन् फॉर्च्युनर गाडी, कोण बाजी मारणार?
'महाराष्ट्र केसरी' विजेत्यावर बक्षिसांचा पाऊस, रोख रक्कम अन् फॉर्च्युनर गाडी, कोण बाजी मारणार?
  • महाराष्ट्र केसरीचा विजेता मालामाल होणार

  • फॉर्च्युनर गाडीसह रोख बक्षीस मिळणार

  • मानाची गदा कोण पटकावणार?

View All
advertisement