Pune Ganesh : पुण्यात दर्शनासाठी गणेशभक्तांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी; Video पाहून मनात धडकी भरेल

Last Updated:

Pune Ganesh : पुण्यात आज गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी दुपारनंतर प्रचंड गर्दी केली आहे.

गणेशभक्तांची रेकॉर्डब्रेक गर्दी
गणेशभक्तांची रेकॉर्डब्रेक गर्दी
पुणे, 24 सप्टेंबर (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : देशभरात गणेशोत्सवाचा आनंद शिगेला पोहचला आहे. मुंबईनंतर पुण्यातही गणेश उत्सवाचा एक वेगळाच रंग पाहायला मिळतो. पुण्यात आज गणेश मंडळांना भेटी देण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी दुपारनंतर प्रचंड गर्दी केली आहे. पुण्यातील बाजारपेठांमधील सगळे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. रविवार असल्याने मोठ्या संख्येने गणेश भक्त दर्शनासाठी बाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. सर्वांचं आकर्षण असलेला पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी तोबा गर्दी झाल्याचे चित्र आहे. याचा एक व्हिडीओ समोर आला असून यात याची प्रचिती येऊ शकते.
गौरी-गणपती आणि पाच दिवसांच्या गणपती विसर्जसाठी शनिवारी सकाळपासूनच काही ठिकाणी गर्दी वाढली होती. तर शनिवारी सायंकाळी उशिरा या गर्दीने उच्चांक गाठला. आज रविवारी सर्वांनाच सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने गणेशभक्त बाहेर पडले आहेत. यंदा गणेशोत्सवामध्ये एकच शनिवार-रविवार आल्याने या गर्दीचे प्रमाणही अधिक असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मुंबईत तर याआधीच गर्दीने रेकॉर्ड तोडला आहे. पण, आता पुण्यातही अलोट गर्दी जमली आहे.
advertisement
पुण्यात दुपारनंतर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गर्दी दिसू लागली. त्यातही विशेष करुन श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची रीघ लागली. मुंगीलाही शिरायला जागा दिसत नाही. त्यात वरुन पाऊस सुरू आहे. तरीही गणेशभक्त पावसातही दर्शनरांगेतून बाजूला जातना दिसत नाही.
advertisement
अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने 131 व्या गणेशोत्सवात अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला मंगळवारी (ता.19) सकाळी 10 वाजून 23 मिनिटांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाली. मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्‌घाटन त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता झाले. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सहचिटणीस अमोल केदारी, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतीश रासने, सौरभ रायकर आणि मंगेश सूर्यवंशी उपस्थित होते.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Ganesh : पुण्यात दर्शनासाठी गणेशभक्तांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी; Video पाहून मनात धडकी भरेल
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement