Pune Job : पुण्यातील 'या' प्रसिद्ध ठिकाणी जॉबची सुवर्णसंधी; कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा; जाणून घ्या

Last Updated:

Sassoon Hospital Job Recruitment : पुण्यातील एक प्रसिद्ध सरकारी संस्था त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी मोठी जॉब संधी उपलब्ध करून देत आहे. या भरतीत विविध पदांसाठी एकूण रिक्त जागा आहेत.

News18
News18
पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयात सरकारी नोकरभरतीसाठी प्रक्रिया सुरू झाली असून, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या एकूण 354 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरले असून, एकूण 26 हजारांहून अधिक अर्ज नोंदवले गेले आहेत.
कक्षसेवक पदासाठी 165 जागा राखीव असून, यासाठी सर्वाधिक 14 हजार 246 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर, बटलर पदाच्या फक्त 4 जागांसाठी केवळ 43अर्ज आले आहेत, म्हणजेच यासाठी सर्वात कमी प्रतिसाद नोंदला गेला आहे. अन्य पदांमध्ये आया 38, सेवक 36, पहारेकरी 23, शिपाई 2, क्ष-किरण सेवक 15, हमाल 13, रुग्णपटवाहक 10, सहायक स्वयंपाकी 9, नाभिक 8, स्वयंपाकी सेवक 8, प्रयोगशाळा सेवक 8, दवाखाना सेवक 4, माळी 3, प्रयोगशाळा परिचर 1, भांडार सेवक 1आणि गॅस प्रकल्प चालक 1 अशी विभागणी आहे.
advertisement
या भरतीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 15 ऑगस्टपासून सुरु झाली होती आणि अंतिम तारीख 30 ऑगस्ट होती. प्रत्येक पदासाठी सामाजिक आरक्षण लागू असून, वेतन 15 हजार ते 47 हजार 600 रुपयांच्या दरम्यान आहे.
अर्जदारांच्या संख्येवरून पाहता, सर्वाधिक अर्ज कक्षसेवक पदासाठी आले आहेत. सेवक पदासाठी 2,340, क्ष-किरण सेवक 2,155, पहारेकरी 1,741, प्रयोगशाळा परिचर 1,509, आया 1,041, हमाल 734, संदेशवाहक 353 दवाखाना सेवक 374, शिपाई 259, रुग्णपटवाहक 258, माळी 220, सहायक स्वयंपाकी 190, नाभिक 148, भांडार सेवक 145, प्रयोगशाळा सेवक 133, गॅस प्रकल्प चालक 128, स्वयंपाकी सेवक 111 आणि बटलर 43 अर्ज प्राप्त झाले आहेत.
advertisement
जिल्ह्यांनिहाय अर्जांचा आकडा पाहता, पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक 9,950 अर्ज आले आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधून 1,896, नांदेड 1,694, अमरावती 1,236, लातूर 1,170 आणि अहिल्यानगरमधून 1,051 अर्ज नोंदवले गेले आहेत.
ससून रुग्णालयात ही भरती अनेक वर्षांनंतर सरळसेवा प्रक्रियेद्वारे सुरु करण्यात आली असून, आयबीपीएस कंपनीच्या माध्यमातून पूर्ण ऑनलाइन पद्धतीने अर्ज घेण्यात आले आहेत. रुग्णालयाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांच्या माहितीनुसार, ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविली जात आहे आणि उमेदवारांना विविध पदांसाठी समान संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
मराठी बातम्या/पुणे/
Pune Job : पुण्यातील 'या' प्रसिद्ध ठिकाणी जॉबची सुवर्णसंधी; कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा; जाणून घ्या
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement