Mpox : जीवघेण्या मंकीपॉक्सवर येणार स्वदेशी लस, सिरम इन्स्टिट्यूटची मोठी घोषणा

Last Updated:

Mpox Vaccine : पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने मंकीपॉक्सवरील स्वदेशी लसीची निर्मिती करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.

News18
News18
चंद्रकांत फुंदे, पुणे : मंकीपॉक्स आजाराची रुग्णसंख्या वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. आता या आजारावर स्वदेशी लसीचं काम सुरू कऱण्यात आलं असून ते सिरम इन्स्टिट्यूटमध्ये केलं जात असल्याची माहिती समोर आलीय. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने मंकीपॉक्सवरील स्वदेशी लसीची निर्मिती करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. आफ्रिकेतील बाराहून अधिक देशांमध्ये मुले आणि प्रौढांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे.
मंकीपॉक्सच्या विषाणूचा नवा प्रकार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. या आजारावरील लसींचा पुरवठा कमी आहे. या परिस्थितीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. मंकीपॉक्समुळे धोक्यात आलेल्या लाखो लोकांसाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या आजारावरील लसीसंदर्भात काम करत आहे. वर्षभरात सकारात्मक निष्कर्ष हाती येण्याची आशा आहे,असे पूनावाला यांनी नमूद केले.
advertisement
WHO नं गेल्या दोन वर्षात दुसऱ्यांदा हा आजार सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणजेच Public Health Emergency असल्याचं घोषित केलं आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये Monkeypox चा एक अतिशय धोकादायक प्रकार आढळला आहे. WHO नं गेल्या आठवड्यातच या आजाराबाबत आपत्कालीन बैठक बोलावली होती. मंकीपॉक्सचा नवीन प्रकार अत्यंत घातक आहे आणि जर तो आफ्रिकेतून बाहेर गेला तर तो जगभरात पसरण्याची शक्यता WHOचे महासंचालक डॉ. टेड्रोस ॲधानोम गेब्रेयसस यांनी व्यक्त केली होती.
advertisement
सध्या मंकी पॉक्सचा प्रसार काँगो, बुरुंडी, केनिया, रवांडा, आणि काँगोच्या सीमेला लागून असलेल्या युगांडामध्येही झाला आहे आणि त्यामुळे हा आजार इतर देशांमध्येही पसरण्याची भीती WHO नं व्यक्त केली आहे. 2022 मध्ये लंडनमध्ये झाली. जागतिक आरोग्य संघटनेनं त्याला mpox असं नाव दिलं. 2022 मध्ये, मंकीपॉक्सची तीव्रता जाणवली. त्यावेळी, 100 हून अधिक देशांमध्ये mpox च्या रुग्णांची नोंद झाली, यावेळी 100 जणांचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या/पुणे/
Mpox : जीवघेण्या मंकीपॉक्सवर येणार स्वदेशी लस, सिरम इन्स्टिट्यूटची मोठी घोषणा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement