50 जणांना घेऊन जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात भीषण अपघात, कारलाही उडवलं, पोलीस घटनास्थळी

Last Updated:

Private Bus Accident at Tamhini Ghaat: रायगड जिल्ह्यातील माणगाव इथं ताम्हिणी घाटात एका खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. एका तीव्र वळणावर हा अपघात झाला.

News18
News18
मोहन जाधव, प्रतिनिधी रायगड: रायगड जिल्ह्यातील माणगाव इथं ताम्हिणी घाटात एका खासगी बसला भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. एका तीव्र वळणावर हा अपघात झाला. यावेळी खासगी बसने एका कारला देखील उडवलं आहे. यामुळे ही कार रस्ता ओलांडून झाडीत अडकून बसली. या अपघातात २७ प्रवासी जखमी झाले असून यातील आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस आज सकाळी साडे अकराच्या सुमारास पुण्यातील भोसरी परिसरातून निघाली होती. बसमध्ये भोसरी येथील सावन IB Auto प्रा. लिमिटेड कंपनीचे 50 कर्मचारी होते. हे सर्वजण काशिद बीचला फिरायला जात होती. दरम्यान, शुक्रवारी दुपारी ही खाजगी बस ताम्हीणी घाटात आली असता एका तीव्र वळणावर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं.
advertisement

27 प्रवासी जखमी

ही बस रस्त्यावरून खाली उतरली आणि बाजुच्या खडकाळ भागाला जाऊन धडकली. यावेळी या बसने एका कारला देखील उडवलं. ही अपघात ग्रस्त कारही रस्ता ओलांडून एका झाडीत जाऊन अडकली. या अपघातात 27 प्रवासी जखमी झाले असून 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारसाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयला पाठवण्यात आले आहे.
advertisement
हा अपघात ताम्हिणी घाटातील प्रसिद्ध 'गारवा हॉटेल' परिसरात झाला. तीव्र वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगरावर जाऊन आदळली. बस दरीत कोसळली असती तर मोठा अनर्थ घडला असता, मात्र डोंगराला धडकल्यामुळे बस थांबली. या धडकेचा वेग इतका प्रचंड होता की बसमधील प्रवासी जागीच जखमी झाले आणि बसचेही मोठे नुकसान झाले आहे.
advertisement

बचावकार्य आणि मदतकार्य वेगवान

अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस प्रशासन आणि स्थानिक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
50 जणांना घेऊन जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात भीषण अपघात, कारलाही उडवलं, पोलीस घटनास्थळी
Next Article
advertisement
Gold Investment: सोनं एवढं महाग तरी तुमच्या बजेटमध्ये कसं घ्यायचं? टेन्शन नाही वापरा ही ट्रिक
Gold Investment: सोनं एवढं महाग तरी तुमच्या बजेटमध्ये कसं घ्यायचं?
  • गोल्ड ETF द्वारे १००० रुपयांपासून सोन्यात डिजिटल गुंतवणूक करता येते, मेकिंग चार्ज लागत नाही

  • गोल्ड ETF मध्ये ९९.५% शुद्धतेची खात्री, चोरीची भीती नाही आणि त्वरित विक्री सहज शक्य आहे

  • डीमॅट अकाउंटद्वारे सोन्याचे युनिट्स खरेदी-विक्री करता येतात, गरज पडल्यास कर्जही मिळू शकते

View All
advertisement