khedkar Case Update: पूजा मॅडममुळे अख्खं 'घर' अडचणीत; होणार मोठी कारवाई?
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
पुणे महापालिकेनं पूजा खेडकरांच्या आईला नोटीस बजावली आहे. पुण्यातील नॅशनल सोसायटीतील ओम दीप बंगला मनोरमा खेडकरांच्या नावावर आहे, या बंगल्याच्या सीमावर्ती भिंतीनजीक अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम सात दिवसांत हटवा असे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत.
पुणे: वादग्रस्त आय.ए.एस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात सातत्याने नवनव्या अपडेट समोर येत आहेत. या दरम्यान या आई आणि लेकीनं केलेले अनेक कारनामे समोर येताना दिसत आहेत, त्यात आता पुणे महापालिकेनं पूजा खेडकरांच्या आईला नोटीस बजावली आहे. पुण्यातील नॅशनल सोसायटीतील ओम दीप बंगला मनोरमा खेडकरांच्या नावावर आहे, या बंगल्याच्या सीमावर्ती भिंतीनजीक अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम सात दिवसांत हटवा असे आदेश पुणे महापालिकेने दिले आहेत.
प्रकरणाची अशी सुरूवात:
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर आता चांगल्याचं वादात सापडल्या आहेत. प्रोबेशन काळातच पूजा खेडकर यांनी स्वतंत्र ऑफिस, गाडीवर अंबर दिवा, दिमतीला शिपाई अशा नियमबाह्य मागण्या केल्या. त्यानंतर पूजा खेडकर चांगल्याच चर्चेत आल्या. त्यानंतर तात्काळ त्यांची बदली वाशिमला कऱण्यात आली. यानंंतर पूजा खेडकर यांच्याबद्दलचा पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शासनाला पाठवलेला 25 पानी रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये व्हॉट्सऍप चॅटबद्दलचे धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत.
advertisement
खेडकर यांच्या बंगल्यात झाकून ठेवण्यात आलेली ऑडी कार पूजा खेडकर या पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी वापरत होत्या. या कारवर त्यांनी महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली होती आणि नारिंगी रंगाचा दिवा लावला होता. पोलिसांच्या मते हा वाहतूक नियमांचा भंग असून पोलिसांनी 177 अंतर्गत कारवाई कारवाई केली.
मनोरम खेडकरांवर देखील आरोप: पूजा यांच्या आई मनोरमा खेडकरांवर देखील गंभीर आरोप आहेत. नुकताच पूजा खेडकर यांची आई मनोरमा आणि वडिलांविरोधात देखील पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे, त्यामुळे पुढे आता आणखी काय घडणार आहे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता पुणे महापालिकेने बजावलेल्या नोटीसीला मनोरमा खेडकर तातडीने प्रतिसाद देतात का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यांनी सात दिवसांत अनधिकृत बांधकाम न हटवल्यास पुणे महानगर पालिका कारवाईचा बडगा उचलण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 13, 2024 7:43 PM IST


