Pune : महिलांनो 'ही' गोष्ट दुर्लक्ष करणं पडणार महागात, पुणे जिल्ह्यात घोंगावतंय गंभीर संकट

Last Updated:

Women Health Report : स्वस्थ नारी, सशक्त परिवार मोहिमेत पुणे जिल्ह्यातील 2.45 लाख महिलांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी तब्बल 62 हजार महिलांना विविध आरोग्याच्या तक्रारी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

महिला आरोग्य 
महिला आरोग्य 
पुणे : राज्यातील महिलांच्या आरोग्याविषयी धक्कादायक निष्कर्ष स्वस्थ नारी, सशक्त परिवार या राज्यव्यापी अभियानातून समोर आले आहेत. महिलांच्या आरोग्यविषयक जागरूकता वाढवण्यासाठी आणि आजारांचे लवकर निदान व्हावे या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पुणे जिल्ह्यात तब्बल 2.45 लाख महिलांची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यापैकी सुमारे 62 हजार महिलांना विविध आरोग्याच्या तक्रारी असल्याचे आढळून आले आहे.
आरोग्य विभागाचा मोठा उपक्रम
या मोहिमेद्वारे महिलांच्या 20 प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, स्तन तपासणी, गर्भाशयमुख कर्करोग तपासणी, हाडांची घनता आणि मानसिक आरोग्य तपासणीचा समावेश होता. ग्रामीण भागापासून ते शहरांपर्यंत सर्वत्र या तपासण्या करण्यात आल्या. आरोग्य विभाग, महिला बालविकास विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा सक्रिय सहभाग यात राहिला.
advertisement
तपासणीतून समोर आलेल्या आकडेवारीनुसार 18500 महिलांना उच्च रक्तदाब तर 14200 महिलांना मधुमेह असल्याचे स्पष्ट झाले. या दोन्ही आजारांचे प्रमाण ग्रामीण भागातही वाढताना दिसत आहे, जे भविष्यात गंभीर आरोग्यसंकट ठरू शकते. महिलांमध्ये स्तन कर्करोगाच्या संशयित रुग्णांची संख्या 2450 इतकी आढळली आहे.
विशेषतहा अॅनिमियाचे प्रमाण अत्यंत चिंताजनक असून, 78 हजार महिलांचे हिमोग्लोबिन 11 ग्रॅमपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हणजेच, सुमारे 32 टक्के महिलांमध्ये रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता आढळली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मते, ही बाब महिलांच्या एकूण आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारी आहे.
advertisement
या मोहिमेत आढळलेल्या तक्रारींनुसार 27 हजार महिलांना पुढील वैद्यकीय उपचार देण्यात आले. डॉक्टरांच्या मते, पोषणाचा अभाव, अनियमित जीवनशैली आणि आरोग्याविषयी उदासीनता ही महिलांमधील आजारवाढीची प्रमुख कारणे आहेत. या अभियानातून महिलांच्या आरोग्यविषयी महत्त्वाची माहिती मिळाली असून, विशेषतः अॅनिमिया, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे पुढील काळात नियमित तपासण्या, पोषणपूरक आहार वितरण आणि जनजागृती उपक्रम राबवले जाणार आहेत,’ असे उपसंचालक, आरोग्य सेवा, पुणे मंडळ डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.
advertisement
महिलांचे आरोग्य म्हणजे परिवाराचे, समाजाचे आरोग्य हे लक्षात घेता, स्वस्थ नारीचे स्वप्न साकार करण्यासाठी आता नियमित तपासणी आणि आरोग्यजागृती हा एकमेव उपाय असल्याचे या मोहिमेतून स्पष्ट झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune : महिलांनो 'ही' गोष्ट दुर्लक्ष करणं पडणार महागात, पुणे जिल्ह्यात घोंगावतंय गंभीर संकट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement