पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी, उष्णतेचा तडाखा वाढला, पाहा आजचं हवामान अपडेट
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात 27 जानेवारी रोजी उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.
पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात 27 जानेवारी रोजी उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मुख्यतः आकाश निरभ्र राहील. कमाल तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत राहील, तर किमान तापमान 14 ते 19 अंशांच्या दरम्यान राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
27 जानेवारीला पुणेकरांना दुपारच्या वेळी उन्हाचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता आहे. 27 जानेवारीला पुण्यामध्ये सकाळी धुके आणि नंतर निरभ्र आकाश असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे.
advertisement
कोल्हापुरात किमान 14 तर कमाल 33 अंश सेल्सिअस तापमान राहील. साताऱ्यात किमान 16 तर कमाल 33 अंश सेल्सिअस तापमान असेल. सोलापुरात किमान 19 आणि कमाल 34 अंश सेल्सिअस तापमान राहील. तर सांगलीमध्ये किमान 17 आणि कमाल 34 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं जाण्याचा अंदाज आहे. दिवस आणि रात्रीच्या तापमानातील या बदलांमुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
advertisement
उष्णतेच्या या लाटेचा विचार करून शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांना आवश्यक पाणी देऊन संरक्षण करावे. जनावरांसाठी सावलीची व्यवस्था करावी आणि त्यांना पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. उष्णतेमुळे जनावरांमध्ये उष्माघात आणि डिहायड्रेशनचा धोका वाढतो. त्यामुळे पशुपालकांनी विशेष काळजी घ्यावी.
दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणे शक्यतो टाळावे. बाहेर पडण्याची गरज असल्यास हलके, सैलसर कपडे परिधान करावेत आणि उन्हापासून संरक्षणासाठी टोपी, गॉगल्स आणि छत्रीचा वापर करावा. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी आणि फळांचे रस पिण्यास प्राधान्य द्यावे. लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांनी विशेष दक्षता बाळगावी कारण या लोकांना उष्णतेचा अधिक परिणाम होऊ शकतो.
advertisement
उष्णतेच्या संभाव्य लाटेचा सामना करण्यासाठी नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि आरोग्यदायी सवयी अंगिकाराव्यात. बदलत्या हवामानापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सर्वांनी वेळोवेळी हवामान बदलांची माहिती घेत स्वतःची काळजी घेणे आवश्यक ठरते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
January 27, 2025 7:41 AM IST