Pune: 'माघार घ्या अन्यथा संतोष देशमुख करू' 'आप'च्या उमेदवाराला भर रस्त्यावर धमकी, पुण्यातील घटना

Last Updated:

फुरसुंगी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आम आदमी पार्टीचे उमेदवार यशवंत अरुण बनसोडे यांना ही धमकी दिली आहे.

News18
News18
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : राज्यभरात नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मतदान केंद्रावर हिंसक घटना घडल्या आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 'निवडणुकीतून माघार घ्या अन्यथा संतोष देशमुख करू” अशी धमकीच  फुरसुंगी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या आपच्या उमेदवाराला दिल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार,  फुरसुंगी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आम आदमी पार्टीचे उमेदवार यशवंत अरुण बनसोडे (वय ४२) यांना अज्ञात व्यक्तीने कार अडवून जीवे मारण्याची धमकी दिली.  'निवडणुकीतून माघार घ्या, अन्यथा तुमचा संतोष देशमुख करू,” अशा शब्दांत धमकी देत बनसोडे यांची कार अडवण्यात आली होती. या प्रकरणी बनसोडे याांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल केली.  त्यांच्या तक्रारीच्या आधारावर अज्ञात आरोपीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
advertisement
नेमकं काय घडलं? 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यशवंत बनसोडे हे 1 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ ते नऊच्या सुमारास सासवड रोड रेल्वे स्टेशन परिसरातून चारचाकीने जात होते. त्याच वेळी एका अनोळखी व्यक्तीने हात दाखवून त्यांची कार थांबवली. वाहन थांबवतात तोच तो इसम पुढे आला आणि निवडणुकीतून माघार घेण्यास जबरदस्ती करत धमकी दिली. माघार नाही घेतली तर तुमचा संतोष देशमुख करू, अशा शब्दात त्याने धमकी दिली. फिर्यादींच्या तक्रारीनुसार, त्या इसमाच्या कमरेला लोखंडी शस्त्र लपवलेलं होतं. एवढेच नव्हे तर रेल्वे पटरीजवळ दुसरा एक अनोळखी व्यक्ती उभा असल्याचंही त्यांनी पाहिलं. त्याच्याजवळ देखील शस्त्र असण्याची शक्यता तक्रारीत नमूद आहे. ही संपूर्ण घटना पाहून फिर्यादींनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.
advertisement
फुरसुंगी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १२६(२), ३५२(३) तसेच महाराष्ट्र पोलीस संरक्षण अधिनियम ३७(१)(३) सह १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश नलवडे या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेची निवडणूक स्थगित केली आहे. नगराध्यक्ष, सदस्य आणि इतर सर्व पदांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून, निवडणूक प्रक्रिया पुन्हा ४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. मात्र, निवडणूक स्थगित असतानाही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारालाच धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune: 'माघार घ्या अन्यथा संतोष देशमुख करू' 'आप'च्या उमेदवाराला भर रस्त्यावर धमकी, पुण्यातील घटना
Next Article
advertisement
Gold Price Prediction : नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा धक्कादायक अंदाज
नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध
  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

  • नव्या वर्षाआधीच सोनं All Time High गाठणार! प्रति तोळा किती महागणार? एक्सपर्टचा ध

View All
advertisement