Baramati: जीभ ओठावर फिरवली अन् समोर पोरांना नजरेनं इशारा, बारामतीच्या शाळेत 'ती'चा 'कातिल डान्स', VIDEO व्हायरल
- Published by:Sachin S
- Reported by:JITENDRA JADHAV
Last Updated:
बारामती तालुक्यातील मोरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात हा प्रकार घडला आहे.
पुणे : सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे तर पण अशातच बारामतीतला एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मोरगाव येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या मनोरंजन कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या डान्सर बालाने अश्लील हावभाव करत डान्स केला. या व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. अखेरीस शाळा प्रशासनाला याबद्दल स्पष्टीकरण द्यावं लागलं.
बारामती तालुक्यातील मोरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात हा प्रकार घडला आहे. तीन महिन्यापूर्वीचा हा व्हिडीओ असल्याची माहिती समोर आली आहे. शाळेच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात एक तरुणी अंगविक्षेप करत लावणी सादर करताना दिसतेय.
बारामती तालुक्यातील मोरगाव येथील शाळेत तरुणीचा डान्स व्हायरल pic.twitter.com/Rqn7cAZvne
— VIRALबाबा (@viralmedia70) August 18, 2025
advertisement
या संदर्भात विद्यालयाचे मुख्याध्यापक अर्जुन कोकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, गाव परंपरेनुसार गेल्या अनेक वर्षांपासून विद्यालयाच्या प्रांगणात ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त विविध मनोरंजनाचे कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात घेतले जातात. त्याचा व्हिडिओ असल्याचे सांगून संस्थेचा यामध्ये कसलाही सहभाग नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
सालाबाद प्रमाणे यावर्षीही मोरगाव ग्रामस्थांचे ग्रामदैवत भैरवनाथ यात्रेनिमित्त यात्रा कमिटी यांच्या वतीने विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन 6,7,8 मे 2025 रोजी विद्यालयाच्या प्रांगणात केलं होतं. या कार्यक्रमाच्या वेळी मे महिन्यात शाळांना सुट्टी असल्याने विद्यालय बंद होते. त्यामुळे यात्रा कमिटी ग्रामस्थ मोरगाव यांच्या विनंती आणि मागणीवरून तोंडी परवानगी दिली गेली होती.
advertisement
या उत्सवात विद्यालय आणि विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी यांनी कसलाही सहभाग घेतला नव्हता, असंही स्पष्टीकरण विद्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
August 18, 2025 11:56 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Baramati: जीभ ओठावर फिरवली अन् समोर पोरांना नजरेनं इशारा, बारामतीच्या शाळेत 'ती'चा 'कातिल डान्स', VIDEO व्हायरल


