घरात अशा प्रकारे लावलेले मनी प्लांट बनते नुकसानीचे कारण, तिजोरी होते रिकामी
- Published by:Prachi Dhole
Last Updated:
वास्तुशास्त्रातही मनी प्लांटला घरासाठी खूप शुभ मानले जाते
मुंबई, 16 ऑगस्ट: अनेक जण घरात मनी प्लांट लावतात. ही वनस्पती सुंदरही दिसते आणि तिच्या काळजीमध्ये जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर घरामध्ये मनी प्लांट लावल्याने धन, सुख-समृद्धी येते आणि सकारात्मक ऊर्जा राहते असे मानले जाते.
वास्तुशास्त्रातही मनी प्लांटला घरासाठी खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की ज्या घरात मनी प्लांटचे रोप असेल तेथे पैशाची कमतरता नसते. पण जर तुम्ही मनी प्लांटशी संबंधित नियमांचे पालन केले नाही तर या प्लांटमुळे तुमचे मोठे नुकसानही होऊ शकते. त्यामुळे वास्तूनुसार जाणून घ्या मनी प्लांट लावताना तुम्हाला कोणते नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
advertisement
घरात मनी प्लांट असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा
घरात लावलेले मनी प्लांट शुभ प्रतीक मानले जाते. यामुळे आर्थिक स्थिती सुधारते आणि सकारात्मकता निर्माण होते. पण त्याची पाने पिवळी पडली किंवा सुकली तर लगेच काढून टाकावीत. अन्यथा पैशाचे नुकसान होऊ शकते.
advertisement
मनी प्लांटचे रोप वेलवर्गीय असते. त्यामुळे जेव्हा ते वाढू लागते तेव्हा त्याची वेल धागा किंवा काठीच्या साहाय्याने वर चढवा. वास्तूनुसार मनी प्लांटच्या वेलीला जमिनीला स्पर्श करणे अशुभ मानले जाते. याचा परिणाम घरातील सुख-समृद्धीवर होतो.
लक्षात ठेवा की कोणी कितीही जवळचे असले तरी आपल्या घरी लावलेला मनी प्लांट दुसऱ्याला देऊ नये. त्यामुळे घरातील आशीर्वाद निघून जातात. त्याचबरोबर मनी प्लांटचे रोप कोणालाही भेट देऊ नये.
advertisement
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट नेहमी दक्षिण-पूर्व दिशेला लावावा. ही दिशा गणेशाची मानली जाते. पण लक्षात ठेवा मनी प्लांट ईशान्येला लावू नये.
मनी प्लांटची वनस्पती शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. अशा स्थितीत शुक्रवार हा लावण्यासाठी शुभ मानला जातो. मात्र शुक्रवारी या रोपाची कटिंग करू नका
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 16, 2023 2:50 PM IST