ओवाळीते भाऊराया..! भाऊबीजेला भावाला कधी औक्षण कराल? जाणून घ्या शुभ मुहूर्त
- Published by:Mohan Najan
- Reported by:Priyanka Jagtap
Last Updated:
दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. याला यमद्वितीया असेही म्हणतात. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
प्रियंका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : भावा बहिणीच्या अतूट नात्याचे प्रतीक म्हणजे भाऊबीज. गोवर्धन पूजेनंतर हा सण साजरा केला जातो. या प्रसंगी बहिणी आपल्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी तसेच सुख-समृद्धी वाढवण्याच्या कामना करतात आणि भाऊ आपल्या बहिणींना आयुष्यभर त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतात. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. याला यमद्वितीया असेही म्हणतात. हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष प्रसंगी बहिणी आपल्या भावाला टिळक लावतात आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात. यंदाची भाऊबीज कधी आहे आणि भाऊबीज साजरी करण्यासाठी त्याचा शूभ मुहूर्त काय आहे? याबद्दच आपल्या पौराणीक विद्या अभ्यासक सूरज सदानंद म्हशेळकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
भाऊबीज हा सण हिंदू सणांमधील महत्त्वाचा आणि प्रसिद्ध सण मानला जातो. या सणाचे महत्त्व भाऊ आणि बहिणींमधील आदर आणि प्रेम व्यक्त करणे आहे. 2024 मध्ये 3 नोव्हेंबर रोजी भाऊबीज आहे आणि दुपारी 1.15 ते 3.10 पर्यंत भाऊबीज शुभ मुहूर्त आहे. ज्या बहिणी दिवसा भावाला टिळक लावू शकत नाहीत अशा बहिणी संध्याकाळी 06 ते रात्री 09 या वेळेत शुभ आणि अमृत चोघडियामध्ये भावाला टिळा लावू शकतात, असं सूरज सदानंद म्हशेळकर यांनी सांगितलं.
advertisement
भाऊबीजेला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. यादिवशी बहीण चंद्राला देखील ओवाळते आणि भावाला ओवाळते. या दिवशी भावाला हातामधे लाला आणि पिवळा धागा बांधलेला चांगले असते. शास्त्रानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला साजरी केली जाते. या दिवशी यम आपल्या बहिणीच्या घरी गेला होता. त्यावेळी बहिणीने दाखविलेल्या आदराने प्रसन्न होऊन त्यांनी भाऊ-बहिणी या दिवशी यमुनेत स्नान करून यमाची पूजा करतील असे वरदान दिले. मृत्यूनंतर त्याला यमलोकात जावे लागणार नाही. याबद्दल अशी देखील मान्यता आहे. म्हणूनच भाऊबीज हा बहीण आणि भाऊ यांच्यातीळ अतूट नात्यासाठी समर्पित हिंदु उत्सवांपैकी एक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात, असं सूरज सदानंद म्हशेळकर यांनी सांगितलं.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2024 7:18 AM IST