Daily Numerology: जन्मतारखेनुसार 12 सप्टेंबरचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?
- Published by:Prachi Dhole
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 12 सप्टेंबर 2024चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं जाणून घ्या.
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, भावंडांशी वाद झाल्याने चिंता वाढेल. मुलांसोबत आनंदाचे क्षण साजरे कराल. मनात नवीन घरखरेदीचा विचार करत असाल तर त्यासाठी ही चांगली वेळ आहे. बँक बॅलन्स वाढू शकतो. अतिविचारांमुळे त्रास होऊ शकतो.
Lucky Number : 15
Lucky Colour : Dark Brown
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
श्री गणेश सांगतात, सातत्याने घरगुती ताण जाणवेल. मुलं शाळेतून चांगली बातमी घेऊन येतील. मालमत्ता खरेदी फायनल करण्यासाठी ही वेळ चांगली आहे. शेअर मार्केटमधून नफा मिळू शकतो. दिवस प्रेम आणि आनंदाने भरलेला असेल. जोडीदाराचा सहवास भावनिक समाधान देईल.
Lucky Number : 18
Lucky Colour : Red
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
श्री गणेश सांगतात, भविष्यातील नियोजनाकरिता दिवस चांगला आहे. संवाद आणि चिकाटीच्या जोरावर अनेक अडथळे पार कराल. डोळ्याला संसर्ग झाला असेल तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या. ऑफिसमधील सहकाऱ्यांकडून त्रास होऊ शकतो. पण तुम्ही संयम बाळगावा. जोडीदार आणि भावंडांसोबत चांगले सूर जुळतील.
Lucky Number : 11
Lucky Colour : Orange
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
श्री गणेश सांगतात, आज तुमचा मूड तात्त्विक असेल. मनात असंतोषाची भावना दिवसभर राहील. कोणत्याही प्रकारचा संघर्ष नुकसानदायक ठरू शकतो. नवीन व्यावसायिक भागीदारीसाठी दिवस चांगला आहे. प्रेमळ व्यक्तींसाठी दिवस खास असेल. तुम्ही काही भावनिक आठवणी जपून ठेवाल.
Lucky Number : 3
Lucky Colour : Coffee
vastu tips: पैशांच्या तंगीपासून सुटकेसाठी या मसाल्याचा उपाय खूप फायदेशीर ठरेल!
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
श्री गणेश सांगतात, खरी माहिती आणि अफवा यातील फरक ओळखा. गेल्या काही दिवसांत आलेले कटू अनुभव आता हळूहळू दूर होतील. डोळ्यांची काळजी घ्या. डोळ्यांच्या समस्या जाणवत असतील तर लगेच डॉक्टरांकडे जा. पैसे सहज कमवाल. भविष्यासाठी पैशाची बचत करा. नातं कमकुवत होत आहे. तुम्हाला त्याकडे लक्ष द्यावे लागेल. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वेळ काढा.
advertisement
Lucky Number : 5
Lucky Colour : Parrot Green
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, नको असलेल्या संगतीत अडकाल. त्यामुळे तुमची प्रतिष्ठा आणि काम खराब होऊ शकते. अनपेक्षित मतभेदामुळे काय आणि का घडतंय असा प्रश्न पडेल. मालमत्तेबाबत वाद होऊ शकतो. पण हा वाद सामंजस्यानं सोडवण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक नेटवर्कमुळे नवीन व्यवसाय संधी मिळवू शकाल. जोडीदार तुमच्या शारीरिकच नव्हे तर भावनिक आणि बौध्दिक गरजा पूर्ण करेल.
advertisement
Lucky Number : 1
Lucky Colour : Golden Brown
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, तुमच्या स्वभावामुळे घरात वारंवार वाद होतील. मनात असंतोषाची भावना दिवसभर राहील. प्रतिस्पर्ध्याशी वाद टाळा आणि मुत्सदेदगिरी करा. नशीबाची साथ मिळेल. तुम्हाला जॅकपॉट लागू शकतो. प्रियकराशी वाद झाला तर वाद वाढवू नका, समस्या आपोआप सुटतील.
Lucky Number : 17
Lucky Colour : Parrot Green
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, तुम्ही नेतृत्व करण्यास तयार आहात, असं अध्यात्म सूचित करते. अनावश्यक वाद टाळा. दीर्घकाळापासून ताणतणाव आणि गोंधळाची मानसिकता होती. मात्र आता तुम्हाला उत्साही वाटेल. आकर्षणाच्या जोरावर कामं कराल. जुन्या कर्जाची परतफेड करावी लागेल. गृहजीवनात भावनिक सुसंवाद असेल.
Lucky Number : 6
Lucky Colour : Chocolate
Rudraksha: 7 मुखी रुद्राक्ष धारण करण्याचे जबरदस्त फायदे अनुभवाला फक्त 7 दिवसात
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
श्री गणेश सांगतात, तुम्ही चांगल्या क्षणाचा आनंद घ्याल. पण हा आनंद डोक्यात जाऊ देऊ नका. बाहेर जेवायला जाल. धैर्य आणि दृढनिश्चय काहीसा कमी असेल. नवीन गोष्टी करण्यास उत्सुक नसाल. दुपारी संधी मिळतील. या संधी तुमच्यासाठी लाभदायक असतील. नातेसंबंधाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या. संवादातून समस्या सुटू शकते.
Lucky Number : 18
Lucky Colour : Lemon
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2024 8:34 PM IST