advertisement

vastu tips: पैशांच्या तंगीपासून सुटकेसाठी या मसाल्याचा उपाय खूप फायदेशीर ठरेल!

Last Updated:

vastu tips in marathi: तुमच्या स्वयंपाकघरात मसाले वापरून पैसा आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी खास टिप्स

News18
News18
धणे आपण मसाल्यात हमखास वापरतो, मसाल्यात धणे वापरल्याने जेवणाला अप्रतिम चव येते. धणे वापरल्याने संपत्तीही टिकून राहते असं म्हटलं जातं. चला जाणून घेऊया धण्याचे कोणते उपाय तुमच्या घरात सुख आणि संपत्ती आणतात.
तणाव दूर राहतो
असे म्हणतात की ज्यांच्या घरात नेहमी तणावाचे वातावरण असते त्यांनी पांढर्‍या कपड्यात धणे बांधून पूर्व दिशेला ठेवावे, त्यामुळे घरातील तणाव दूर राहतो.
आर्थिक संकट दूर करण्यासाठी उपयुक्त
जर तुमच्या घरात शांतता नसेल आणि घरात नेहमीच आर्थिक संकट असेल तर बुधवारी हिरवी धणे गायीला खाऊ घालावे. असे मानले जाते की, असे केल्याने घरात आर्थिक संकट येत नाही आणि तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली राहते.
advertisement
कागदावर धणे
जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीकडून पैसे घ्यायचे असतील आणि तो तुम्हाला ते परत करत नसेल तर तुम्ही त्या व्यक्तीचे नाव एका पांढऱ्या कागदावर लिहावे, त्यावर कोरडे धणे ठेवावेत आणि ते पाण्यात वाहू द्यावे. हा उपाय शुक्रवारी करावा. लवकरच तुमचे अडकलेले पैसे मिळतील.
विविध समस्यांपासून मुक्तीसाठी
जर तुम्हाला दररोज एक ना कोणत्या समस्यांनी घेरले असेल आणि तुमचा दिवस अडचणीत जात असेल तर अशा स्थितीत लाल कपड्यात कोरडी धणे ठेवा आणि हनुमानजींना अर्पण करा. तसेच हनुमान चालिसाचे पठण करावे. असे केल्याने समस्यांपासून मुक्ती मिळते.
advertisement
पैशाशी संबंधित समस्यांपासून मुक्ती
प्रत्येकजण पैशाशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त असतो, अशा स्थितीत मातीच्या भांड्यात कोरडे धणे ठेवा आणि कोणत्याही महिन्याच्या पूर्वार्धात त्यामध्ये नाणी ठेवा आणि उत्तर दिशेला स्थापित करा. यामुळे पैशाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
vastu tips: पैशांच्या तंगीपासून सुटकेसाठी या मसाल्याचा उपाय खूप फायदेशीर ठरेल!
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement