काही कामं नागपंचमीला चुकूनही करू नये, नाहीतर दुप्पटीनं वाढू शकतात अडचणी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
नागपंचमीला महादेवांसह नागदेवतेला पूजलं जातं. या पूजेमुळे कुंडलीतील सर्पदंश आणि पर्यायानं अडचणी दूर होतात, अशी मान्यता आहे.
शुभम मरमट, प्रतिनिधी
उज्जैन : श्रावण हा पवित्र महिना महादेवांना समर्पित आहे. असं म्हणतात की, या काळात महादेवांची मनोभावे पूजा केल्यास मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या महिन्यात अनेक सणवार साजरे होतात, सुरूवात होते ती नागपंचमीपासून. यंदा हा सण साजरा होईल 9 ऑगस्टला.
नागपंचमीला महादेवांसह नागदेवतेला पूजलं जातं. या पूजेमुळे कुंडलीतील सर्पदंश आणि पर्यायानं अडचणी दूर होतात. परंतु काही कामं अशी असतात जी नागपंचमीला चुकूनही न करण्याचा सल्ला दिला जातो. नाहीतर आहेत त्यापेक्षा जास्त अडचणी निर्माण होऊ शकतात. ही कामं नेमकं कोणती आहेत, जाणून घेऊया.
advertisement
सुरूवात करूया नागपंचमी पूजा विधीपासून...
या दिवशी सूर्योदयाच्या आधी उठून आंघोळ करावी. मग महादेवांची आणि नागदेवतेची विधीवत पूजा करावी. नागदेवतेला फळ, फूल, मिठाई आणि दूध अर्पण करावं. ज्यांच्या कुंडलीत कालसर्प किंवा राहू-केतूसंबंधित दोष असतील, त्यांनी तर ही पूजा आवर्जून करावी, असा सल्ला उज्जैनचे ज्योतिषी आनंद भारद्वाज देतात.
नागपंचमीला चुकूनही करू नका काही कामं!
advertisement
- नागपंचमीला चुकूनही सापाला मारू नये. जर आपण या दिवशी सापाला दुखावलं, तर आपल्या डोक्यावर जे पाप चढतं, त्याचा त्रास आपल्या येणाऱ्या पिढ्यांना सहन करावा लागू शकतो.
- नागपंचमीला जेवण बनवण्यासाठी तव्याचा किंवा लोखंडाच्या कढईचा वापर करू नये. असं केल्यास नाग देवतांना कष्ट सोसावे लागू शकतात, ज्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो.
- नागपंचमीला जमीन खोदू नये. कारण आत सापाचं बिळ असू शकतं. खोदकामामुळे ते नष्ट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नकळत जरी असं झालं, तरी आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना दोष लागू शकतो.
- ज्योतिषशास्त्रानुसार, नागपंचमीला कोणत्याही धारदार वस्तूचा वापर करू नये. या दिवशी शिलाई करणं, हत्यारांना धार लावणं अशुभ मानलं जातं.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
view commentsLocation :
Ujjain,Madhya Pradesh
First Published :
August 08, 2024 12:33 PM IST


